बीडमध्ये जिल्हात मॉन्सूनच्या पावसाला जोरदार सुरवात.

51

बीडमध्ये जिल्हात मॉन्सूनच्या पावसाला जोरदार सुरवात.

बीडमध्ये जिल्हात मॉन्सूनच्या पावसाला जोरदार सुरवात.
बीडमध्ये जिल्हात मॉन्सूनच्या पावसाला जोरदार सुरवात.

✒️श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी✒️
बीड,दि.12 जुन:- बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मॉन्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मॉन्सूनच्या पावसाने बळीराजा सुखावल असलातरी पावसाचा जोर बघता शेतीतली कामात खोळंबली असल्याचे दिसून येत आहे. बीड जिल्हातील अनेक तालुक्यातील नद्या खळखळल्या व पूर जनक परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी सकाळ पासून झालेल्या जोरदार पूर्व मोसमी पावसाने नदया खळाळून वाहत आहे. तर इतर छोट्या नद्या व नालेही भरून वाहत असल्याचे चित्र संपुर्ण जिल्हात दिसून येत आहे.

काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे बीड जिल्हात पेरणीचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिन्याच्या प्रारंभी सुरू झालेला पाऊस सुरू आहे. पहाटे झालेल्या पावसाने बीड जिल्हातील अक्षरश: नदया काठोकाठ भरून वाहत आहे. तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

उन्हाळ्याचे दिवस संपताच बीड जिल्हात सलग तीन दिवस पाऊस पडला आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्र, शेत शिवार व बांधावर गवताची हिरवळ फुटली आहे. दरम्यान, रस्त्ये खचल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था विस्कळित झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस अडचण निर्माण झाली.