राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीचे नेते अभिजीत फाळके पाटील यांच्याकडून नाभिक एकता मंचला एप्रॉन ची मदत.

60

✒अक्षय पेटकर, वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि✒
वर्धा ;- दिनांक13 जून;- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे नेते अभिजीत फाळके पाटील यांच्या तर्फे नाभिक एकता मंच वर्धा जिल्हा यांना स्थानिक विश्राम गृह वर्धा येथे एप्रॉन चे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे नेते अभिजीत फाळके पाटील उपस्थित होते. प्रमुख उपस्थिति म्हणून रितेशजी घोगरे, प्रविण पेठे, राष्ट्रवादी वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. कपिल मून, सचिन घोडे, नाभिक एकता मंचचे जिल्हाध्यक्ष प्रशांत राजुरकर, सतीष गवळी उपस्थित होते. कोरोनामुळे अनेक लोकांचे व्यवसाय डबघाईस आले त्यात नाभिक एकता मंच हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. अशा कोरोनाच्या वाईट परिस्थिति मधे एक मदतिचा हात एप्रॉन च्या माध्यमातून दिला. यापुढेही आपल्या हक्काचा एक माणुस म्हणून तुमच्यासोबत आहो असा विश्वास कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजीत फाळके पाटील यांनी उपस्थितांना दिला. यावेळी प्रवीण पेठे व नाभिक एकता मंचचे जिल्हाध्यक्ष प्रशांत राजुरकर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. यावेळी नाभिक एकता मंचच्या सर्व सभासदांनी आपल्या हक्काचा माणुस राष्ट्रवादीचे नेते अभिजित फाळके पाटील यांचे आभारपत्र व संघटनेचे मासिक देवून आभार मानले. या कार्यक्रमात नाभिक एकता मंचच्या जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातुन आलेले सभासद खुशाल मानकर, राहुल आंबुलकर, आशिष बडवाईक, संदीप चातुरकर, कृष्णा माहुलकर, किशोर घुमे इत्यादि नाभिक एकता मंचच्या सदस्याना एप्रॉन चे वाटप करण्यात आले व उर्वरित एप्रॉन मंचच्या पदाधिकाऱ्यांकडे जिल्ह्यात वितरित करण्याकरीता सुपुर्द करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. कपिल मून यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिनजी घोडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम उगेमुगे व देवा अरगुडे यांनी विशेष परिश्रम घेतले.