ब्रम्हपुरी तालुक्यात रेती भरलेला ट्रॅक्टर अवैध वाहतूक करतांना पलटून दोन जखमी.
ब्रम्हपुरी तहसील कार्यालयालगत रेती तस्करीच्या घटणांनी नागरिक अवाक

✒अमोल माकोडे, तालुका प्रतिनिधी ब्रम्हपुरी✒
ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी तालुक्याला वेढा घालून गेलेल्या वैनगंगा नदीचे एकही घाट अजून पर्यंत लिलाव झाले नसल्यामुळे फार मोठया प्रमाणात रात्रीच्या वेळेस अवैध रेती चोरी चालू असते. रेतिघाटावरील अवैध उत्खनन व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यास उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचे मार्फत एक नियंत्रण समितीगठीत करून त्यांच्या माध्यमातून गौण खनिज उत्खननावर प्रतिबंध घातल्या जाते परंतु ब्रम्हपुरी तालुक्यात ह्या समित्या कागदावरच असल्यामुळे अर्हेर – नवरगाव घाटावरून रात्रभर 40 ते 50 ट्रॅक्टर च्या साह्याने अवैध रेतीची चोरी होत आहे. संदर्भात वारंवार तक्रारी होऊन आणी वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित होवून सुद्धा, भ्रष्टाचाराचे पांघरून धारण केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कुठलीही तमा नसून अधिकारी वर्गाकडून मिळणाऱ्या पाठबळाने व आशीर्वादानेच चोराच्या मनावरील कायद्यातील धाक ओसरत असून गुन्हेगारीला ब्रम्हपुरीचे वातावरण पोषक ठरत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आज दिनांक 12/06/2021 ला सकाळी 6.30 ते 7.00 च्या सुमारास ब्रम्हपुरीच्या एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या राईस मिल मध्ये बांधकामा करिता कुर्झा येथील ट्रॅक्टर च्या साह्याने अऱ्हेर नवरगाव घाटावरून चोरीची रेती नेत असताना भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरवरील ड्रायवर चे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटून ट्रॅक्टर ने पलटी खाल्ली व यात कुर्झा येथील दोन मजूर गंभीर रित्या जखमी झाले ही घटना अंगलट येऊ नये म्हणून त्या जखमी मजुरांना ब्रह्मपुरीतील मोठया दवाखान्यात न नेता रेती चोरीचे प्रकरण दाबन्याच्या उद्देशाने गावगाड्यातील डॉक्टर च्या साह्याने उपचार करून घरी पाठविन्यात आले म्हणजे ” तेरी भी चूप और मेरी भी चूप ” असा प्रकार करून होणारी पोलीस केस दाबण्याचा पुरेपूर प्रयन्त केल्या गेला असल्याचे निदर्शनास येते.
रेती चोरीच्या वारंवार बातम्या न्यूज पेपरला प्रकाशित होऊन सुद्धा ब्रम्हपुरी येथील कायद्यांचे रक्षणकर्ते झोपेचा सोंग घेऊन असल्यामुळे आपले स्वार्थ साधत असल्यामुळे रेती माफियांवर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त ट्रिप व्हाव्यात म्हणून स्पर्धा लावल्यागत ट्रॅक्टर भरधाव वेगाने चालविल्या जातात पण अश्या प्रकारे अपघात होऊन गरीब मजूराचा किंवा रस्त्यावरील मुला बाळाचा जीव गेल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न जनतेला निर्माण झाला आहे .