आई जेवन नाही बनवल म्हणून रागावली म्हणून मुलीने मैत्रिणीसह केली जंगलात जाऊन आत्महत्या.
आई जेवन नाही बनवल म्हणून रागावली म्हणून मुलीने मैत्रिआई जेवन नाही बनवल म्हणून रागावली म्हणून मुलीने मैत्रिणीसह केली जंगलात जाऊन आत्महत्या.णीसह केली जंगलात जाऊन आत्महत्या.

आई जेवन नाही बनवल म्हणून रागावली म्हणून मुलीने मैत्रिणीसह केली जंगलात जाऊन आत्महत्या.

आई जेवन नाही बनवल म्हणून रागावली म्हणून मुलीने मैत्रिणीसह केली जंगलात जाऊन आत्महत्या.
आई जेवन नाही बनवल म्हणून रागावली म्हणून मुलीने मैत्रिणीसह केली जंगलात जाऊन आत्महत्या.

✒️MVN क्राईम रिपोर्टर✒️
कसारा,दि.13 जुन:- कसारा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आईने जेवण बनविण्यास सांगीतले पण मुलीने ते बनवले नाही त्यामुळे आई आपल्या मुलीवर रागावली. आपली आई आपल्या प्रिय मैत्रिणीसमोर रागावली. यामुळे ती संतापली आणि राग मनात धरून मनीषा धापटे वय 16 वर्ष या मुलीने व तिची मैत्रीण शोभा धापटे वय 16 वर्ष या दोघींनी आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. या दोघींचे मृतदेह शनिवारी कसाऱ्याजवळील जंगलात सापडले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

कसारा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रांत येणा-या पेठ्याचा पाडा येथील दोघी मैत्रिण मंगळवारपासून बेपत्ता होत्या. दोन्ही मुलींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत शनिवारी कसारा येथील जंगलात सापडले. या दोन्ही मुलींनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मंगळवारी मनीषा हिला तिच्या आईने सकाळी शेतावर जात असताना तू घरीच थांबून दुपारचे जेवण बनवून ठेवायला सांगून तिचे आईवडील शेतावर निघून गेले. नंतर मनीषा तिच्या शोभा या मैत्रिणीच्या घरी गेली व तिथे खेळत बसली. दुपारी मनीषाची आई शेतावरून घरी डबा घ्यायला आली असता मनीषाने घरात काहीही बनवले नसल्याचे लक्षात आले. मनीषाही नसल्याने ती मैत्रिणीकडे गेल्याचे समजले. मनीषाची आई शोभा हिच्या घरी गेली व तिथे मनीषाला जेवण बनवले नाही म्हणून ओरडली व पुन्हा शेतावर निघून गेली.

आई मैत्रिणीसमोर ओरडली म्हणून मनीषा रागात घरी गेली व दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडली. मनीषाच्या पाठोपाठ शोभाही घराबाहेर पडली. मंगळवारी दुपारपासून मनीषा, शोभा बेपत्ता झाल्या. मुली घरी न आल्याने दोन्ही कुटुंबांनी शोध घेतला असता त्या सापडल्या नाहीत.
शेवटी स्थानिक ग्रामस्थ व धापटे कुटुंबातील लोकांनी उंबरमाळी, फणसपाडाजवळच्या डोंगरावर शोध सुरू केला असता तिथे मनीषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सकाळी 9 वाजताच्या सुमारास सापडला. याची माहिती कसारा पोलिसांना कळवली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, संकेत देवळेकर दाखल झाले. मनीषाचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी शोभाचा शोध सुरू केला असता 500 मीटरच्या अंतरावर शोभाचा मृतदेह दुपारी चार वाजता आढळला. दोन्ही तरुणींनी विषारी औषध प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here