चंद्रपूर शहरात मुसळधार पावसाची हजेरी; वीज पडल्याने एका घराची भिंत कोसळली सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.

संदीप तूरक्याल, चंद्रपूर शहर प्रतिनिधी
चंद्रपूर :- सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून विजेच्या कडकडाट देखील तसाच जोरदार सुरु आहे पण आज दिनांक 13 जुन ला सायंकाळी 5 वाजेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील पठाणपुरा हनुमान मंदिरा जवळ राहणारे बालाजी रासपायले याचा घरी बीज पडुन घरातिल भिंत कोसळली असून घरी असणाऱ्या लोकांत भीतीचे वातावरण पसरले आहे असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही तरी या गरीब परिवारातील घरांची भिंत कोसळल्याने यांच्यावर विचार करण्याची वेळ आली आहे तरी शासनाच्या वतीने काही मदत झाल्यास या पावसाळ्यात घरात पाणी जाणार नाही आणि त्यांना ती भिंत तयार करता येईल अशी मागणी या परिसरातील लोक या परिसरातील लोकांची मागणी आहे .