स्वच्छ व सुंदर नगरी बनली अस्वच्छ व दुर्गंधी ची नगरी* *शहरात दोन ते तीन महिन्यांपासून नाली सफाईचे काम बंद*

50

*स्वच्छ व सुंदर नगरी बनली अस्वच्छ व दुर्गंधी ची नगरी*

*शहरात दोन ते तीन महिन्यांपासून नाली सफाईचे काम बंद*

स्वच्छ व सुंदर नगरी बनली अस्वच्छ व दुर्गंधी ची नगरी* *शहरात दोन ते तीन महिन्यांपासून नाली सफाईचे काम बंद*
स्वच्छ व सुंदर नगरी बनली अस्वच्छ व दुर्गंधी ची नगरी*
*शहरात दोन ते तीन महिन्यांपासून नाली सफाईचे काम बंद*

ब्रम्हपुरी :-
कधी काळी स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळख मिळवणारी ब्रम्हपुरी. नगर परिषदेच्या स्थापनेच्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात आजपर्यंत कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात नसलेली शहरातील अस्वच्छता व दुर्गंधी सद्यस्थितीत मुख्यत्वे महाभयंकर अश्या संसर्गजन्य कोरोना काळात शहरात दिसून येत असल्याने ब्रम्हपुरी नगरपरिषद च्या कार्यप्रणालीवर “अकार्यक्षम” असा ठप्पा जनसामाण्याच्या भावनेतून शहरात व्यक्त होतांना दिसत आहे.

शहरात ठीक-ठिकाणी जमा असलेला घाण कचरा ,दोन ते तीन महिन्या पासून नाली सफाई बंद असल्याने सर्वत्र पसरणारी दुर्गंधी त्यातचं
स्वच्छता कर्मचाऱ्यांचा वारंवार होतं असलेला पगाराची थकबाकी, विषयाची गंभीरता लक्षात न घेता निविदा काढतांना होतं असलेला विलंब अश्या नियोजन शून्य कारभाराने विविध समस्यांनी ग्रस्त असलेला ब्रम्हपुरी नगरपरिषद प्रशासन शहरवासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला स्वच्छतेचा गंभीर प्रश्न सोडवणार का…❓ या विवंचनेत सामान्य नागरिक त्रस्त आहेत.

पालकमंत्र्याची पॅनल म्हणून मोठा गाजावाजा होतं ब्रम्हपुरी नगरपरिषद मध्ये काँग्रेस पक्ष कित्तेक वर्षानंतर बहुमतात सत्तारूढ झाले, शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही अशी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या घोषणेने शहरवासी सुखावले आणी शहराचा सर्वांगीण विकास होणार या आशेत होते शहराला बराच निधीही मिळाला मात्र सद्यस्थितीत असलेली शहरातील अस्वच्छता व दुर्गंधी बघता सत्ताधारी लोकांच्या अकार्यक्षम कार्यप्रणालीने शहरात स्वच्छतेचे तीन-तेरा वाजल्याचे दिसत आहे.

प्रतिक्रिया –
कोविड-19 परिस्थिती मध्ये संपूर्ण कामगार तीन महिन्यादरम्यान कोविड संदर्भातील ईतर कामात व्यस्त होते, आणी फंडिंग ची कमी व टेंडर काढतांना उशीर होतं असल्याने स्वच्छता मोहीम मागे राहिली आता लवकरच आम्ही शहराला स्वच्छ व दुर्गंधी मुक्त करू….

सौ सरिता माधव पारधी
आरोग्य सभापती न. प. ब्रम्हपुरी