हिंगणघाट येथे मनसे तर्फे राज ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरा.

✒मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
हिंगणघाट,दि.14 जुन:- महाराष्ट्र नव निर्माण सेना वर्धा जिल्हाच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मनसे वर्धा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दिव्यांग (अपंग) लोकांना पावसाचे कपडे (रेनकोट) देण्यात आले. व तसेच महिला सेनेतर्फे अगदी गरीब मुलांना बूक, पुस्तके व चित्र काडण्याचे साहित्य देण्यात आले. तसेच वाहतूक सेनेतर्फे वृक्षारोपण ट्री गार्ड लावून वृक्ष रोपण अनेक ठिकाणी करण्यात आले. तसेच प्रसिद्ध प्रमुख तर्फे अगदी झोपडपट्टी या भागातल्या महिलांना साडी वाटप करण्यात आले. तसेच शेतकरी सेने तर्फे अगदी गरजू शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी उपयोगी असणारे प्लॅस्टिक व काही साहित्य देण्यात आले. तसेच विद्यार्थी सेने तर्फे रिक्शा चालक काम मजदूर अशा शेकडो लोकांना छत्री वाटप करण्यात आले अशा पद्धतीने सामाजिक उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.