रावेरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीला सुरवात..!

✒ हमीद तडवी, प्रतिनिधी✒
जळगाव,दि.14 जुन:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि.14 जून रोजी तालुक्यात ऑनलाईन महाराष्टू नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीचा ता. अध्यक्ष यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सदर सदस्य नोंदणीस मोठा प्रतिसाद मिळाला असून हजारोच्या संख्येने सदस्य नोंदणी झाली. या सदस्य नोंदणीला युवक युवती वयोवृद्ध यांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिल्याची माहिती रावेर तालुका अध्यक्ष संदिपसिंह राजपूत यांनी प्रतिनिधी शी बोलतांना दिली.
पक्षाचे नेते माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर कामगार नेते गजानन राणे विनय भोईटे व संपर्क प्रमुख हरीश जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली आणि जिह्याचे सचिव ऍड जमिलभाई देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्टू नवनिर्माण सेना पक्षाचे सर्व पदधिकारी व मनसैनिकांच्या सहकार्याने महाराष्टू नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आनलाईन मनसे नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला असून त्यात तालुक्यातुन वेगवेगळय़ा गावातून सदस्य नोंदणी करण्यात आली. या सदस्य नोंदणीला युवक, युवती, जेष्ठ यांनी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला आहे. महाराष्टू नवनिर्माण सेना पक्षावर व विकासाभिमुख नेतृत्त्वावर विश्वास ठेवून सदस्य नोंदणीस उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्यामुळे जिल्हयात भविष्यात महाराष्टू नवनिर्माण सेना अनेक निवडणूकीत आपले वर्चस्व निर्माण करणार असल्याचे स्पष्टं दिसून येत असल्याचे तालुकाध्यक्ष संदिपसिंह राजपूत यांनी सांगितले.