पिक कर्ज देण्यास विलंब करणाऱ्या बँकांवर कारवाई करा, मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

53

साहिल महाजन, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी✒
राळेगाव(यवतमाळ)दि.14 जुन:- खरीप हंगाम चालु झाला असतांना सुद्धा काही बँकां मुद्दाम शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना बि-बियाणे,खते व शेतीपयोगी साहित्य खरेदी करण्यासाठी खाजगी सावकारांकडे हात पसरावे लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बँकांमार्फत लवकर कर्ज देण्यात यावे तसेच कर्ज देण्यास विलंब करणाऱ्या बँकांवर व शाखा व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यवतमाळ जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे तहसिलदार साहेब राळेगाव यांच्यामार्फत देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट, मनविसे तालुकाध्यक्ष शैलेश आडे, मनवासे तालुकाध्यक्ष आरिफ शेख, तालुका उपाध्यक्ष गणेश काकडे, मंगेश तोडसे, अमोल गेडाम, भूषण फरकाडे, पवन पचारे आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.