नागपुर येथे पोलिस कर्मचा-यांने केला महिलेवर अत्याचार, बलात्काराचा गुन्हा दाखल.

55

नागपुर येथे पोलिस कर्मचा-यांने केला महिलेवर अत्याचार, बलात्काराचा गुन्हा दाखल.

नागपुर येथे पोलिस कर्मचा-यांने केला महिलेवर अत्याचार, बलात्काराचा गुन्हा दाखल.
नागपुर येथे पोलिस कर्मचा-यांने केला महिलेवर अत्याचार, बलात्काराचा गुन्हा दाखल.

युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.14 जुन:- नागपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुर येथील पोलिस शिपायाने लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आल्याने सर्वीकडे संताप व्यक्त होत आहे. फेसबुकवरून दोघांची ओळख झाली होती. आरोपीने वेगवेगळी कारणे पुढे करीत पीडितेकडून लाखो रुपयेसुद्धा उकळले. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी पोलिस शिपायाविरूद्धा गुन्हा दाखल केला असून तो शहर पोलिस मुख्यालयात क्यूआरटी पथकात तैनात आहे.

आशिष प्रकाश काळसर्पे वय 28 वर्ष रा. पोलिस लाइन टाकळी असे पोलिस शिपायाचे नाव आहे. कोराडी हद्दीत राहणारी पीडित महिला इव्हेंट मॅनेजरचे काम करते. तिचे पहिले लग्न झाले असून 14 वर्षाची मुलगी आहे. पतीसोबत न पटल्याने 2009 साली तिने पतीपासून घटस्फोट घेतला. त्यानंतर गोवा येथे इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करू लागली. आजारी आईची देखभाल करण्यासाठी ती परतली होती. ऑक्टोबर 2020 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून तिची आशिषसोबत ओळख झाली. काही दिवसानंतर पीडितेच्या आईचा मृत्यू झाला. भावनिक काळात त्याने जवळीक साधली. बॉडी बिल्डर असून जिममध्ये लोकांना प्रशिक्षण आणि डायट प्लॅन तयार करून देत असल्याचेही त्याने सांगितले. 28 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी एकच्या सुमारास पीडित महिला त्याच्या घरी गेली. त्याने दिलेली कॉफी पिताच महिला घामाघूम झाली. आशिषने तिला हॉलमधील बेडवर आराम करण्यास सांगितले. ती शुद्धीत नसताना आशिषने लैंगिक शोषण केले. पीडितेने जाब विचारताच लग्न करण्याचे आमिष दाखवीत तिला शांत केले. दुसऱ्याच दिवशी मंगळसूत्र, कुंकू, मिठाई घेऊन आशिष तिच्या घरी गेला. गळ्यात मंगळसूत्र घालून आणि डोक्यात कुंकू लावून लग्न केल्याचा देखावा केला. दरम्यान, त्याने वेगवेगळी कारणे पुढे करीत लाखो रुपये उकळले. सोबत लैंगिक शोषणही सुरू ठेवले. पीडितेने कायदेशीर लग्नाचा आग्रह धरला असता 26 मे रोजी महिलेने लग्नाचा विषय काढला असता त्याने लग्न करण्यास स्पष्टपणे नकार दिला. पीडितेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आशिष काळसर्पेवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.