*९,००,८०० रुपयांची अवैध दारू पकडण्यात वरोरा पोलिसांना यश*
*वरोरा पोलिसांची कडक कारवाई बघून अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले*
त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953
चिमूर (वरोरा ): -सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की वरोरा शहरातील अभ्यंकर वार्ड येथे पोलीसांनी संशयरीत्या येणारे चारचाकी वाहन क्र. MH 12 EX 7291 हे दारू भरून येत आहे अशी मिळाली. त्या आधारे पोलिसांनी सिनेस्टाईलने पाठलाग करून वाहणास पकडले. ज्यामध्ये पोलिसांनी एकूण ९,००,८०० रुपये चा माल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डीबी पथकातील अंमलदार रात्री गस्तीवर असताना गोपनीय माहिती मिळाली की, वरोरा येथे एक चारचाकी वाहन दारू भरलेले येत आहे. या माहितीच्या आधारे वाहन क्र. MH 12 EX 7291 हे संशयितरित्या येताना दिसून आल्यावर त्याचा पाठलाग करून सुयोगनगर अभ्यंकर वार्ड वरोरा येथे सदर वाहन ताब्यात घेण्यात आले. यावेळी वाहनात प्रत्येकी ९० मिली. भरलेल्या ४००.शिश्या अशा ४० पेट्या किंमत ४,००,००० रु. तर प्रत्येकी १८० मिली. भरलेल्या स्टर्लिंग रिझर्व बी -७ च्या ९६ निपा अशा दोन पेट्या किंमत २८८०० रु. प्रत्येकी १८० मिली. भरलेल्या २४० निपा अशा ५ पेट्या किंमत ७२,००० रु. व वाहन क्र. MH 12 EX 7291 किंमत ४,००,००० रुपये असा एकूण ९,००,८०० रु. चा मालासह आरोपी स्वप्नील अंबादास चाफले (३०) रा. पिंपळगाव ता. समुद्रपूर जि. वर्धा यास अटक करण्यात आली आहे.पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.