सिंदेवाही कोविड केअर सेंटरमध्ये कोविड योद्ध्यांचा सत्कार.
माजी केंद्रीय माजी गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर यांचे हस्ते पुष्पगुच्छ व सुरक्षा कीट देऊन गौरव.

मुकेश शेंडे, तालुका प्रतिनिधी सिंदेवाही
सिंदेवाही :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान, युगपुरुष, श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली समर्पित राष्ट्रसेवेस कार्यमग्न असणार्या केंद्र सरकारने सप्त वर्षपूर्ती केली आहे. यानिमित्ताने चंद्रपूर जिल्हा भाजपतर्फे जिल्ह्याभरात विविधांगी सेवाभावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत.
याचं पार्श्वभूमीवर आज सिंदेवाही शहरातील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल असलेल्या बाधितांची निरंतर सेवा करणार्या कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी देशाचे माजी गृहराज्यमंत्री हंसराजजी अहीर यांनी कोविड योद्ध्यांना पुष्पगुच्छ व सुरक्षा किट भेट देऊन त्यांचा गौरव केला. याप्रसंगी, जि. प. समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, जेष्ठ नेते प्रा. गणवीर सर, कमलाकरजी सिद्धमशेट्टीवार, पं. स. सदस्य रितेश अलमस्त, नामदेव लोखंडे, लोकनाथ बोरकर, सुरेश पा. ठाकरे, साईनाथ कुर्रेवार, नगरसेवक दिवाकर पुस्तोडे, हार्दिक सूचक, कोविड सेंटरमधिल डॉक्टर्स, नर्स व कर्मचारी स्टॉप यांसह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.