महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुंबईकडे रवाना

✍️मनोज खोब्रागडे✍️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
नागपूर, दि.15 :- महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ११ ते १४ जूनचा नागपूर दौरा आटपून काल मुंबईला रवाना झाले. काल दुपारी ३ वाजता नागपूर विमानतळावर त्यांना निरोप देण्यात आला.
काल ३ वाजता विमानतळावर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे,पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, विशेष पोलीस महानिरिक्षक नागपूर परिक्षेत्र चिरंजीव प्रसाद, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, पोलीस अधीक्षक नागपूर गामीण राकेश ओला, विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंतराव सराटकर आदी उपस्थित होते.
गेल्या तीन दिवसांमध्ये राज्यपाल विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते. राजभवन येथे विविध सामाजिक संघटनांनी त्यांची भेट घेतली. तीन दिवसांच्या भेटीनंतर काल ते मुंबईकडे रवाना झाले.