यवतमाळ जिल्ह्यात तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांच्या येरझारा    

49

यवतमाळ जिल्ह्यात तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांच्या येरझारा 

यवतमाळ जिल्ह्यात तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांच्या येरझारा 
यवतमाळ जिल्ह्यात तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांच्या येरझारा

साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी✒
यवतमाळ,दि.15 जुन :- यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीला व मशागतीला सुरवात केली आहे. नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हवालदिल  झाला असतांना हंगामाकरिता शेतकरी पैशाची जुळवाजुळव करीत आहेत. खरीप हंगामाकरीता शेतकरी पीक कर्ज काढण्याकरिता बँकामध्ये पीककर्ज घेण्याचे प्रकरण दाखल करीत आहेत व इतरही कामांसाठी शेतकऱ्यांना सातबारा 8अ नकाशा आदी कागदपत्रांची गरज भासत आहे. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी शेतकरी तलाठी कार्यालयाच्या येरझारा मारतांना दिसतात काही गावात तलाठ्यांचे पदे रिक्त असल्याने एकाच तलाठयाकडे  दोन-तीन साझाचा पदभार असल्याचे दिसून येते. त्यामुळे तलाठ्यांना या गावातून त्या गावात जातांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांनाही कागदपत्रांकरिता त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते.