मुंबईतील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम मुदतीत पूर्ण करा; धनंजय मुंडे

54

✒️नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी ✒️
मुंबई,दि.15 जुन:- महाराष्ट्रात माघिल अनेक वर्षा पासून सुरु असलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारक कधी पुर्ण होईल त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयाई वाट बघत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाला गती देवून दिलेल्या मुदतीपुर्व या स्मारकाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी तसेच पुतळा प्रतिकृती अंतिम करण्यासंदर्भातील गठित समितीचे लवकरच पुर्नगठन करण्यात येईल, अशी माहितीदेखील मुंडे यांनी आज दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाचा आढावा धनंजय मुंडे यांच्या दालनात दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्याम तागडे, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, मुंडे यांनी यावेळी कोरोना स्थितीमुळे प्रकल्पाच्या कामांचा मुळ कालावधी वाढला आहे. त्यामुळे स्मारकाच्या कामांना गती देवून ते विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देवून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला.