पळसगाव (जाट) येथिल विकासकामांचे समाजकल्याण सभापती नागराज गेडाम यांचेहस्ते भुमिपुजन.
सी. सी. नाली व सी. सी. रोड बांधकामाचे भुमिपुजन संपन्न.

मुकेश शेंडे, तालुका प्रतिनिधी सिंदेवाही,
सिंदेवाही दि.16 जुन:- सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव (जाट) येथे कै. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सी. सी. नाली व सी. सी. रोड बांधकामाचे अधिकृत भुमिपुजन आज सकाळी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती श्री. नागराज गेडाम यांचेहस्ते पार पडले.
यावेळी प्रामुख्याने पं. स. सदस्य रितेश अलमस्त, सरपंच जगदीश कामडी, उपसरपंच संतोष गायकवाड, ग्रा. स. सुभाष सुकारे, रमेश बनकर, सौ. मंदा आत्राम, सचिन सहारे, सौ. शशीकला उईके, सोनू धनविजय, सौ. प्रियंका अलमस्त, सौ. शालू बनकर ग्रामविकास अधिकारी सौ. मिना नन्नावरे आदींसह ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते.