पिक कर्जाच्या वितरणाचा वेग वाढवा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या बँकांना सूचना.

55

पिक कर्जाच्या वितरणाचा वेग वाढवा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या बँकांना सूचना.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली आढावा बैठक

पिक कर्जाच्या वितरणाचा वेग वाढवा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या बँकांना सूचना.
पिक कर्जाच्या वितरणाचा वेग वाढवा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या बँकांना सूचना.

आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी ✒
 वर्धा 17:- कोरोना काळात व्यावसायिकासोबतच शेतक-याना मोठा फटका बसलेला आहे. यावर्षीच्या मान्सुनला चांगली सुरवात झाली असल्यामुळे शेतक-यांचे उत्पन्न सुध्दा चांगले होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वितरण करण्यात आलेल्या पीककर्जाची आकडेवारी चांगली असली तरी यामध्ये वेग वाढविण्याची गरज आहे. यासाठी बँकानी शेतक-यांच्या अडचणी समजून घ्याव्यात काही तांत्रिक अडचणी असल्यास जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधून त्यांचे निराकरण करुन घ्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यानी सर्व बॅक व्यवस्थापकांना पिककर्ज वाटप आढावा बैठकित केल्यात.

सर्व शेतक-यांना पिकर्जाचे नवीनीकरण करण्याकरीता पत्र पाठवून किंवा एसएमएस व्दारे सूचना दयाव्या त्याचबरोबर शासनाने नियमित पिककर्ज खातेधारकांसाठी जाहिर केलेल्या व्याज सवलत योजनांची माहिती शेतक-यांपर्यंत पोहोचवावी. तसेच पिक योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांना प्रवृत्त करावे. ज्या बँकांचे पिककर्जाचे वितरण सरासरी पेक्ष कमी आहे अशा बँकांनी वरीष्ट कार्यालयाशी पत्रव्यवहार करुन कारवाई करावी. खरीप हंगामातील पिककर्जाचे उद्ष्टि 30 जुन पर्यंत पूर्ण करावे असेही प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.

जिल्हा अग्रणी बॅकेची जिल्हा व्यवस्थापक वैभव लहाने यांनी यावर्षी 14 जुन पर्यंत 151 कोटी 48 लाख रुपयांचे 13 हजार 34 शेतक-यांना पिककर्जाचे वितरण करण्यात आले असून याची टक्केवारी 25.50 टक्के आहे. मागील वर्षी 15 जुन पर्यंत 88 कोटी 13 लाख रुपयाचे 7 हजार 920 शेतक-यांना कर्जाचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती बैठकित दिली. सदर बैठकीच्या सुरूवातीला अग्रणी जिल्हा प्रबंधक, वर्धा यांनी “कोरोना काळात” बँक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सेवेबद्दल तसेच ग्राहकांना कोरोना संसर्ग होऊ नये याकरिता राबविलेल्या विविध उपाययोजना जसे बैरीकेडींग करणे, वर्तुळे आखणे, सावलीसाठी मंडप उभारणे, गेटवर सैनिटायझरची व्यवस्था करणे इ. बद्दल अभिनंदन केले. “बँक आपल्या दारी” या मोहिमेद्वारे जवळपास 70,000 ग्राहकांना निराधार पेंशन योजना, विधवा पेंशन योजना, पीएम किसान सन्मान योजना इ. च्या लाभार्थींना गावागावांमध्ये जाऊन किंवा घरपोच वितरण केले, याकरिता बँक मिञ, बँक सखी, बँका, ग्रामपंचायती आणि पोस्ट ऑफिसेस यांनी घेतलेल्या पुढाकाराचे आणि समन्वयाचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी विशेष आभार मानले. या बैठकीला सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक/ प्रतिनिधी उपस्थित होते.