खाजगी शाळांमध्ये होणारी लूट थांबवा : भा.ज.यु.मो ची मागणी.
उपविभागीय अधिकाऱ्यांसह पं. स सभापती, गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन.
सात दिवसांत कार्यवाही न झाल्यास भा.ज.यु.मो ने दिला आंदोलनाचा इशारा.

✒ अमोल माकोडे ब्रम्हपुरी तालुका प्रतीनिधी ✒
ब्रम्हपुरी :- कोविड-१९ विषाणूचा महामारीमुळे मागील वर्ष्यापासून सर्व खाजगी प्राथमिक/माध्यमिक शाळा/कॉन्व्हेंट अजूनही बंद आहे. सरकारने १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संबंधित विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत देण्याचे सरकारने आदेश दिले आहेत. तरी सुद्धा ब्रम्हपुरी येथील शाळां तर्फे प्रवेश फीस/ शिक्षण शुल्क वेतिरिक्त ग्रंथालय, संगणक व प्रयोगशाळा फीस आकारण्यात येत आहे. ज्या गोष्टींचा वापर नसतांना ही त्याचे शुल्क आकारल्या मुळे त्याचा अतिरिक्त भार हा पालकांवर येत आहे.
या संदर्भात मा. जिल्ह्याधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे दि.१९/०४/२०२१ च्या पत्र क्र./जिपच/शिक्षण(माध्य)/शिविअ/टे-९/८८३/२०२१ अनुसार सर्व प्राथमिक/माध्यमिक शाळा/कॉन्व्हेंट नी अशा कुठल्याही प्रकारची फीस पालकांकडून आकारण्यात येऊ नये असे आदेश शाळांना दिले आहेत. तरी सुद्धा शाळांकडून प्रशासनाला न जुमानता फीस आकारण्यात येत आहे. या संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने खाजगी शाळांमध्ये या पद्धतीने होणारी लूट थांबावी अशी मागणी निवेदनातून केली आहे. या बाबत भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या सह पंचायत समिती सभापती, संवर्ग विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
सात दिवसांच्या आत या विषयावर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या वेळी देण्यात आला. या प्रकरणांवर पंचायत समिती सभापती प्रा.रामलाल दोनाडकर यांनी शिक्षण अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून हा गैरप्रकार थांबण्याचे आदेश दिले.
या प्रसंगी भा.ज.यु.मो शहर अध्यक्ष प्रा.सुयोग बाळबुधे, जिल्हा सचिव तनय देशकर, शहर महामंत्री रितेश दशमवार, महामंत्री स्वप्नील अलगदेवें, शहर सचिव दत्ता येरावार, शहर उपाध्यक्ष प्रमोद बांगरे, अमित रोकडे, जयंत धोटे, अरुण बनकर, कृष्णा वैद्य उपस्थित होते.