*सोयाबीन पिकांवर आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव बळीराजा चिंतेत*

53

*वर्धा/हिंगणघाट मुकेश चौधरी* सोयाबीन पिकांवर आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वातावरण निर्माण झाले आहे.
यासोबतच सोयाबीन पिकावर खोडमाशी तसेच स्पोडोप्टेरा आणि शेंग पोकळनाऱ्या अळीचा सुद्धा प्रादुर्भाव वाढत आहे. आज आमचे प्रतिनिधिने तालुक्यातील कड़ाजना शिवारात भेट देऊन प्रगतिशील शेतकरी विठ्ठल गुळघाणे, सुधाकर वाढ़ई यांचे शेतात भेट दिली, येथे बांधावर परिसरातील सुलतानपुर, पिम्पलगाव, शेगांव (कुंड) येथील शेतकरी उपस्थित होते, त्यांनी कपाशीसह सर्व वेलवर्गीय पिकांवरती अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती देत निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतीव्यवसायाने दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
निसर्गाने मार दिल्यानंतर अजूनही कृषी विभाग जागा झालाच नसल्याचे दिसुन येत आहे.कृषी विभागाचे तसेच महसूल विभागाचे कोणतेहि अधिकारी अजुन बांधावर पोचले नसून साधा पंचनामासुद्धा शासकीय यंत्रनेणे केला नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
एकीकडे मानवावर कोरोणाचे संकट आल्याने सर्वत्र हाहाकार माजला असताना या कोरोणाचे संक्रमणातसुद्धा शेतकऱ्याने कपाशी व सोयाबीनच्या पेरण्या केल्या आहे. अशातच मध्यंतरी पावसाने दांडी मारली असली तरी देखील वेळीच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले होते. आता अशातच सोयाबीनच्या पिकावर अज्ञात रोगांनी हल्ला चढविला आहे, या अज्ञात रोगामुळे शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकाचे सततचे ढगाळ वातावरण तसेच पावसामुळे अचानक सोयाबीन पिकाची पाने हरित वाढ होऊन नंतर आता पिवळे व लाल पडत आहे, या अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला या रोगामुळे सोयाबीनच्या शेंगाच्या दाने भरण्याची प्रक्रिया संपूर्णपणे मंदावली असून सोयाबीन पीकांचे मोठे नुकसान झाल्याचे वर्तविण्यात येत आहे. यामुळे अगोदरच शासकीय धोरणामुळे तसेच त्यानंतर बोगस सोयाबीन बियाणे व आता या अज्ञात रोगामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक दृष्टचक्राच्या संकटात सापडला असल्याचे चित्र दिसते.
या रोगामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या हातातून सोयाबीन पीक निघण्याच्या मार्गावर दिसत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे पानावले आहेत.
कृषी विभागाच्या अनुसार पोळ्या नंतर झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकात काही ठिकाणी अतिरिक्त हरित वाढ झाल्याचे आढळून येत आहे मागील दहा दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे शेतात सोयाबीनच्या खालच्या भागात आद्रता वाढूनही काही बुरशीजन्य रोग जसे शेंगावरील करपा, पानावरील बुरशीजन्य ठिपके या रोगाच्या प्रादुर्भाव बरोबरच खोडमाशी, स्पोडोपटेरा आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या सोयाबीन पीक हे ६० ते ९० दिवसाचे असून शेंगांमध्ये दोन भागाच्या अवस्थेत आहे अशा परिस्थितीमध्ये खाली दिलेल्या कीटकनाशक पैकी एक कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा पैकी एक बुरशी नाशकाची निवड करून तात्काळ फवारणी घेतली तर केळीच आणि बुरशीजन्य शेंगाचे नियंत्रण होऊन चांगल्या प्रकारे शेंगदाणा भरण्यास मदत होईल फवारणी करत असताना पायात शूज वापरावेत त्याचबरोबर नाक आणि तोंड स्वच्छ कापडाने झाकून याबरोबरच संरक्षणात्मक वापर करावा असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
—————————————-