आजपासून (दि. 19 जून) 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होत आहे

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
19/06/2021राज्यात आजपासून (दि. 19 जून) 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होत आहे. शासकीय #लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण देखील नियमितपणे सुरू राहणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे 19 जूनपासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.