मुद्रांक शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन सुविधेचा वापर करावा, परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांकडूनच पेपर खरेदी करावे सह जिल्हा निबंधकाचे आवाहन*

49

*मुद्रांक शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन सुविधेचा वापर करावा, परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांकडूनच पेपर खरेदी करावे सह जिल्हा निबंधकाचे आवाहन*

मुद्रांक शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन सुविधेचा वापर करावा, परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांकडूनच पेपर खरेदी करावे सह जिल्हा निबंधकाचे आवाहन*
मुद्रांक शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन सुविधेचा वापर करावा, परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांकडूनच पेपर खरेदी करावे सह जिल्हा निबंधकाचे आवाहन*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961

नागपूर दि. 18: नागरिकांनी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन सुविधेचा वापर करावा. तसेच परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांकडूनच (स्टँम्प वेंडर) मुद्रांक पेपर खरेदी करण्याचे आवाहन सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी आर. बी. मुळे यांनी केले आहे.
कालच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याबाबत एक बैठक घेतली होती. निर्धारित किंमतीपेक्षा अधिक दराने विकल्या गेल्याच्या तक्रारी आल्यास व अन्य गैरव्यवहार केल्यास मुद्रांक विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्याचे व कारवाई करण्याचे संकेत दिले होते. शहरात एकूण सह दुय्यम निबंधक कार्यालय असून त्यांचे अधिनस्त एकुण 53 परवानाधारक मुद्रांक विक्रेते कार्यरत आहेत.
कोषागारात मुबलक मुद्रांक साठा असून परवानाधारकांनी एक लाख रूपयापर्यत ग्रास प्रणालीतून ई-चलान भरल्यानंतर मुद्रांक साठा प्राप्त झाल्यानंतर लगेच दुसरी चलान कोषागारात सादर करावी, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी अरविंद गोडे यांनी कळवले आहे.
परवानाधारक मुद्रांक विक्रेत्याव्यतीरिक्त इतर व्यक्तीकडून मुद्रांक खरेदी करू नयेत. तसेच त्यांनी जादा पैश्यांची मागणी केल्यास संबंधीत सहदुय्यम निबंधक कार्यालयास तक्रार द्यावी. या कार्यालयाव्दारे दोषी मुद्रांक विक्रेत्यांचा परवाना निलंबीत करण्याची शिफारस प्राप्त होताच त्यांचा परवाना निलंबीत करण्यात येईल.
नागरिकांनी आवश्यक कामासाठी लागणारे मुद्रांक ई-पेमेंटव्दारे खरेदी करता येतील. याबाबतची कार्यपध्दती नोंदणी विभागाच्या वेबसाईटवर डब्ल्यु डब्ल्यु डब्ल्यु डॉट आयजीआर महाराष्ट्रा डॉट जीओव्ही डॉट इन वर उपलब्ध आहे.
ऑनलाईन मुद्रांक ईसएसबीटीआर स्वरूपात खरेदी करण्याकरीता प्राधिकृत सहभागी बॅकांच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने किंवा बॅकांच्या शाखेव्दारे शुल्क प्रदान करता येईल. प्राधिकृत बॅकांची यादी ग्रास प्रणालीवर उपलब्ध आहे. त्यानंतर शासनाने पुरविलेल्या विशेष स्टेशनरीवर संबंधीत बॅकेतून इएसबीटीआर शंभर रूपयापासून पुढे अमर्यादित रकमेपर्यंत प्राप्त करून घेता येईल. ऑनलाईन तसेच ऑफलाईन पध्दतीने सुध्दा मुद्रांक प्राप्त करून घेता येईल. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी आर. बी. मुळे यांनी केले आहे.