राजेंद्र शिंगणे यांची रेमेडिसिव्हीर उत्पादक जेनेटिक लाईफ सायन्सेसला भेट

53

राजेंद्र शिंगणे यांची रेमेडिसिव्हीर उत्पादक जेनेटिक लाईफ सायन्सेसला भेट

राजेंद्र शिंगणे यांची रेमेडिसिव्हीर उत्पादक जेनेटिक लाईफ सायन्सेसला भेट
राजेंद्र शिंगणे यांची रेमेडिसिव्हीर उत्पादक जेनेटिक लाईफ सायन्सेसला भेट

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज वर्धा

19/06/2021राजेंद्र शिंगणे यांची रेमेडिसिव्हीर उत्पादक जेनेटिक लाईफ सायन्सेसला भेट दिली.
रेमेडिसिव्हीर इंजेक्शनचे उत्पादन करणारी वर्ध्याच्या सेवाग्रामस्थित एम आय डी सी मधील जेनेटिक लाईफ सायन्सेस या औषध निर्मिती कंपनीला आज अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कंपनीमध्ये तयार होणाऱ्या सर्व औषधांबाबत माहिती जाणून घेतली.
दुसऱ्या लाटेच्या शिखर कालावधीत रेमेडिसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला असताना जेनेटिक लाईफ सायन्सेस यांनी रेमेडीसीव्हीर औषध तयार करण्यास पुढाकार घेतला. त्यासाठी केंद्रीय महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्र व राज्य शासन, अन्न व औषध प्रशासन विभाग, आणि हैदराबाद येथील हेटरो या मल्टी नॅशनल कंपनीने केलेल्या सहकार्यामुळे वर्धा जिल्ह्यात अगदी कमी कालावधीत औषध तयार करण्यासाठी मान्यता मिळाली असे श्री राजेंद्र शिंगणे यावेळी म्हणाले. रेमडिसिव्हीर औषधाची निर्मिती सुरू झाली त्याचवेळी भेट देणार होतो, मात्र त्यावेळी कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णालयासाठी लागणारा ऑक्सिजनची मागणी आणि निर्मितीमध्येही तफावत निर्माण झाली होती. त्याच्या पुर्ततेमध्ये व्यस्त असल्यामुळे येणे शक्य झाले नसल्याचे श्री शिंगणे यांनी यावेळी सांगितले.
सध्या प्रतिदिन 20 हजार रेमडिसिव्हीर इंजेक्शन तयार होत असल्याची माहिती श्री क्षीरसागर यांनी दिली. म्युकर मायकोसिस वरील उपचारात उपयुक्त असलेले एम्फोटेरेसिन – बी हे औषधही वर्धा जिल्ह्यातून तयार होत असून यासाठी जेनेटिक लाईफ सायन्सेस केलेल्या सहकार्याबाबत त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी कंपनीचे डॉ महेंद्र क्षीरसागर, माजी आमदार सुरेश देशमुख, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त सतीश चव्हाण व इतर उपस्थित होते.