सोमवार २१ जून पासून संपूर्ण पालघर जिल्हा कडक निर्बंधासह लेव्हल ३ मध्ये, रुग्णवाढीचा दर ५.१८% इतका वाढला

50

पालघर जिल्ह्यातील दररोज सापडणाऱ्या रुग्णाची सरासरी पोहचली दोनशेपर्यंत

सोमवार २१ जून पासून संपूर्ण पालघर जिल्हा कडक निर्बंधासह लेव्हल ३ मध्ये, रुग्णवाढीचा दर ५.१८% इतका वाढला
सोमवार २१ जून पासून संपूर्ण पालघर जिल्हा कडक निर्बंधासह लेव्हल ३ मध्ये, रुग्णवाढीचा दर ५.१८% इतका वाढला

मनोज कांबळे, मुंबई
दि.१९ जून २०२१: महाराष्ट्र शासनाच्या ब्रेक द चैन अंतगर्त १४ जून पासून तत्कालीन परिस्थिती पाहता पालघर जिल्ह्यामध्ये निर्बंधस्तर २ बाबतच्या लॉकडाऊन सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र या आठवड्यात जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर ५.१८% पर्यंत पोहचला असून कोरोना रुग्णामंध्ये सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील दररोज सापडणाऱ्या रुग्णाची सरासरी दोनशेच्या घरात पोहचली आहे.

निर्बंधस्तर २ मधील सवलती लागू झाल्यानंतर जिल्ह्यातील बाजारपेठा, पार्क तसेच समुद्रकिनारे सारख्या ठिकाणी लोकांची रहदारी वाढली होती. याचा परिणाम जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येवर दिसून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पालघर जिल्हा प्रशासनाने येत्या २१ जूनपासून संपूर्ण जिह्यामध्ये निर्बधस्तर ३ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

निर्बधस्तर ३ मधील नियम निर्बंधस्तर २ पेक्षा कडक असतील. अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत आठवडाभर चालू राहतील. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सकाळी ७ ते ४ या वेळेत उघडी राहतील परंतु शनिवार आणि रविवारी हि दुकान पूर्णपणे बंद असतील.

मॉल, सिनेमागृहे पूर्णपणे बंद राहतील तर हॉटेल्स, उपहारगृहे ५० % क्षमेतेने चालू राहतील. शासकीय आणि खासगी कार्यालये ५०% कामगार उपस्थितीने चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. सलून आणि ब्युटी पार्लर सुद्धा ५० % क्षमतेने आठवडाभर चालू राहतील. विवाह समारंभासाठी ५० व्यक्तींची तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींच्या उपस्थितीला मान्यता देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील रेल्वेने होणारी प्रवासी वाहतूक बृहन्मुंबई महानगर पालिकेने आखलेल्या नियमानुसार चालू राहील. जिल्ह्यातील वाढता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या निर्बंधस्तर ३ नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पालघर जिल्हा प्रशासनाने जनतेला केले आहे.