राज्य सरकारने आयोजित केलेल्या कोरोनामुक्त गाव स्पर्धेत भाग घेऊन नियोजन करण्याबाबत.

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
9834024045
आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आम आदमी पार्टीने जिंकलेल्या सर्व ग्रामपंचायती गावे कोरोनामुक्त करण्यासाठी आपण *आप हेल्थविंगच्या* सहकार्याने संपूर्ण प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्र राज्य सरकारची कोरोनामुक्त गाव स्पर्धा महाराष्ट्राच्या ६ विभागात घेतली जाणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक विभागातून तीन क्रमांक काढले जाणार असून, प्रथम क्रमांक ५० लाख रुपये, द्वितीय क्रमांक २५ लाख रुपये व तृतीय क्रमांक १५ लाख रु बक्षीस देण्यात येणार आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीत आपलं गाव *१ जून २०२१ ते ३१ मार्च २०२२* या कालावधीत सातत्याने कोरोनामुक्त कसे राहील, कमीत कमी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कशी राहील, तसेच गावात कोरोनामुळे होणारे मृत्युचे प्रमाण कसे कमी राहील, याच्या सर्व उपाययोजना बाबत हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
कोरोनामुक्त गाव करण्यासाठी आरोग्य सर्वे करणे, जास्तीत जास्त अँटीजन टेस्टिंग करणे, विलगिकरण कक्ष स्थापन करणे, रुगणांची ने आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करणे, गावातील १००% लोकांचे लसीकरण करणे, गावात कोविड मदत केंद्र स्थापन करणे व इतर अश्या एकूण २२ मुद्द्यांसहित सर्व गोष्टी गावात सातत्याने अमलात आणणे हे काम आपल्याला करावे लागणार आहे. विभागीय / जिल्हा / तालुका व गाव समित्यांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी लागणारे संपूर्ण मार्गदर्शन, सहकार्य *आम आदमी पार्टी हेल्थ विंग* कडून करण्यात येणार आहे.
*डॉ अमोल पवार* (मोबाईल नंबर ९८६०१ ११०४६) हेल्थ विंग तर्फे समन्वय करतील.
आम आदमी पार्टीनेचे निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, गाव समिती, तालुका व जिल्हा समित्यांनी विभागीय समित्यांच्या माध्यमातून उस्फुर्तपणे सहभागी होऊन आपल्या ताब्यातील सर्व ग्राम पंचायती कोरोनामुक्त करण्याच्या दिशेने प्रयत्न करूया.असे आव्हाहन आम आदमी पार्टी च्या वतीने करण्यात आले आहे