व्दीप नगरची समस्या सोडविण्यासाठी मनपा – नासुप्र ची बैठक घेणार:महापौर*

56

*व्दीप नगरची समस्या सोडविण्यासाठी मनपा – नासुप्र ची बैठक घेणार:महापौर*

व्दीप नगरची समस्या सोडविण्यासाठी मनपा - नासुप्र ची बैठक घेणार:महापौर*
व्दीप नगरची समस्या सोडविण्यासाठी मनपा – नासुप्र ची बैठक घेणार:महापौर*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961

नागपूर : – पूर्व नागपूरातील प्रभाग २५ अंतर्गत व्दीप नगर येथील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता लवकरात-लवकर मनपा व नागपूर सुधार प्रन्यासची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी दिले.
महापौरांनी प्रभाग २५ येथील भांडेवाडी जवळील व्दीप नगर ची नुकतीच पाहणी केली. ज्येष्ठ नगरसेवक श्री. पुरुषोत्तम हजारे यांनी महापौरांना या भागाची पाहणी करण्याचे निवेदन दिले होते. भांडेवाडी जवळील खदान मध्ये पावसाळयात पाणी भरुन जाते तसेच गडरलाईन नसल्यामुळे ४०० – ५०० घरात पाणी शिरुन तुंबले जाते. नागरिकांची या समस्येपासून सुटका करण्यासाठी याठिकाणी गडरलाईन टाकण्याची विनंती श्री. हजारे यांनी केली. यावेळी लकडगंज झोन सहाय्यक आयुक्त साधना पाटील, नगरसेवक नरेन्द्र (बाल्या) बोरकर व झोनचे अभियंता उपस्थित होते.