हिंगणघाट मध्ये राजकिय भुकंप, भाजपा उप नगराध्यक्षासह भाजपाचे 11 नगरसेवक शिवसेनेत.

✒मुकेश चौधरी,विदर्भ ब्युरो चीफ✒
हिंगणघाट/मुंबई, दि.21जुन:- आज हिंगणघाट मध्ये राजकिय भूकंप बघायला मिळाला. भाजपा चे 11 नगर पालिकाचे नगरसेवक आज भाजपाला रामराम ठोकून शिवसेनेत सामिल झाले. हिंगणघाट नगर पालीकेचे भाजपचे सर्व नगर सेवक प्रेम बसंतानी यांच्या मनमानी कारभार आणि आमदार समीर कुणावार यांच्या कार्यपनालीवर मोठा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
नगपरिषद हिंगणघाट येथिल भाजपा पक्षाचे 10 विद्यमान नगरसेवक 1 अपक्ष नगरसेवक यांचा आज वर्षा बंगला मुंबई येथे प्रवेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन शिवसेने मध्ये प्रवेश. उपनगराध्यक्ष चंदू घूसे, नगरसेवक मनिष देवळे, सतिश धोबे, नीता धोबे, मनोज वरघने, सुनिता पचोरी, निलेश पोगळे, संगीता वाघमारे, भास्कर तिवारी, सुरेश मुंजेवार, देवा पडोले असे 11 नगरसेवक शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख माजी खासदार अनंतजी गुडे, वर्धा जिल्हा प्रमुख अनिलभाऊ देवतारे, आर्वी देवळी पुलगांव विधानसभा क्षेत्राचे जिल्हा प्रमुख, बाळाभाऊ शहागडकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश पार पडला या वेळी युवासेना जिल्हा प्रमुख अभिनंदन मुनोत यांची उपस्थीती होती.