**राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, पाचोरा तर्फे तहसीलदार यांना निवेदन*

राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद तर्फे पाचोरा तहसीलदार यांना निवेदन देत तालुक्यातील आदिवासी बहुल लोकसंख्या असुन देखील कोरोनाच्या प्रादुर्भाव वा मुळे काम न मिळाल्या मुळे ऊपास मारीचा प्रश्न निर्माण झालेला असतांना बर्याच शासकीय योजनांपासुन आज देखील वंचीत राहिलेला असुन त्याचाच एक भाग म्हनुन राष्ट्रीय अन्न सुरक्षेचा लाभ बर्याच आदिवासी कुटुंबांना होताना दिसून येत नाही आहे, त्यासाठी स्थानिक प्रशासनाने ऊपाय योजना करावी व नवीन वंचीत राहीलेले कुटुंबांना त्वरीत रेशन कार्ड वाटप करण्यात यावी. तसेच जे कार्ड धारक लाभार्थी आहेत त्यांना देखील अंत्योदय अन्न योजनेचा लाभ मिळावा यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद तर्फे निवेदन देत त्वरित मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखिल देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद चे तालुका अध्यक्ष कन्हैया यादव पवार (भिल) तालुका सचीव जाकीर मुस्तफा तडवी, अबजल लालखा तडवी, कदीर शेनपडु तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.