शंकरबाबा पापळकर यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्याकडून ‘एचव्हीपीएम’ला भेट* *क्रीडा महाविद्यालयात पदभरती व इतर मागण्यांबाबत पाठपुरावा करू:पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर*

55

*शंकरबाबा पापळकर यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्याकडून ‘एचव्हीपीएम’ला भेट*

*क्रीडा महाविद्यालयात पदभरती व इतर मागण्यांबाबत पाठपुरावा करू:पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर*

शंकरबाबा पापळकर यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्याकडून 'एचव्हीपीएम'ला भेट* *क्रीडा महाविद्यालयात पदभरती व इतर मागण्यांबाबत पाठपुरावा करू:पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर*
शंकरबाबा पापळकर यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्याकडून ‘एचव्हीपीएम’ला भेट*
*क्रीडा महाविद्यालयात पदभरती व इतर मागण्यांबाबत पाठपुरावा करू:पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961

अमरावती:-श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा महाविद्यालयातील पदभरतीबाबत पाठपुरावा करू, असे पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी येथे सांगितले. पालकमंत्र्यांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला आज भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, माजी महापौर विलास इंगोले, मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

क्रीडा प्रशिक्षण महाविद्यालयातील रिक्त पदांची भरती होण्याबाबत उच्च शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाकाळात महाविद्यालय बंद असल्याने प्रशिक्षणात अडचणी आल्या. त्यामुळे किमान प्रात्यक्षिक वर्गासाठी तरी परवानगी मिळावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबतही शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

शंकरबाबांवरील विशेषांकाचे प्रकाशन

‘शब्दप्रभु’ या मासिकाच्या शंकरबाबा पापळकर यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. अमरावतीच्या कल्पना नितीनराव देशमुख यांनी या अंकाच्या माध्यमातून आपल्या लेखनातून शंकरबाबा पापळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला आहे. हा मोलाचा दस्तऐवज असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. शंकरबाबा पापळकर यांचे कार्य मोठे आहे. या सच्च्या समाजसेवकाच्या कार्याची ओळख या अंकाच्या माध्यमातून होते, अशी प्रतिक्रिया श्री. वैद्य यांनी व्यक्त केली.

यावेळी लेखिका कल्पना देशमुख, नितीनराव देशमुख, गोपाळराव उताणे, मंजुषा उताणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.