जळगाव जिल्हात भर बाजारात पतीने केली पत्नीची हत्या, एक गंभीर जखमी.

✒विशाल सुरवाडे,जळगाव प्रतिनिधी✒
जळगाव,दि.23 जुन:- जळगाव जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नव-या बायको मधिल वादात नराधम नव-याने बायकोची भर बाजारात हत्या केल्याने सर्वीकडे या घटनेच्या संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आज पती पत्नीच्या वादात मोठ्या प्रमाणात हत्या होत असल्याचे चित्र दिसून येते. जळगावमध्ये देखील पती-पत्नी वाद झाले आणि या वादात संसाराचं होत्याचं नव्हतं झालं. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील बाजारात आलेल्या पूजा सुनील पवार वय 26 वर्ष हिचा पती सुनील भिका पवार वय 34 वर्ष ,रा.शिवाजी नगर, जळगाव याने चाकूने सपासप वार करुन हत्या केली.
या घटनेत पूजाचा भाऊ शंकर भिका चव्हाण वय 18 वर्ष हा गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजता घडली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करित आहे.
सुनिल चव्हान याने आपल्या पत्नीच्या का बर हत्या केली यांच कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पती सुनील पवार हा सतत पत्नी पूजा हिच्यावर संशय घेत होता, तिच्या मोठ्या प्रमाणात छळ करत असल्यामुळे पत्नी नांदायला जात नव्हती. यांच्याच राग धरुन ही हत्या झाली असल्याची माहिती समोर येत आहे.