गोंदिया तालुक्यात कृषि संजीवनी मोहिमेला सुरुवात*

55

*गोंदिया तालुक्यात कृषि संजीवनी मोहिमेला सुरुवात*

गोंदिया तालुक्यात कृषि संजीवनी मोहिमेला सुरुवात*
गोंदिया तालुक्यात कृषि संजीवनी मोहिमेला सुरुवात*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961

गोंदिया,दि.23 : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या मार्गदर्शनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, त्याकरीता तालुका कृषि अधिकारी कार्यालय गोंदिया व आत्मा अंतर्गत तालुका बीज गुणन प्रक्षेत्र कारंजा येथे कृषि विभागाच्या वतीने कृषि संजीवनी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी भिमाशंकर पाटील, तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम, मंडळ कृषि अधिकारी प्रशांत कलेवार, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सुनिल खडसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
तालुका बीज गुणन प्रक्षेत्र कारंजा येथे आयोजित कृषि संजीवनी कार्यक्रमामध्ये उपविभागीय कृषि अधिकारी भिमाशंकर पाटील यांनी भात रोपवाटीका कशी तयार करावी, भात लागवड तंत्रज्ञान वापरुन ड्रम सिडरने पेरणी कशी करावी, ॲझोला, गिरीपुष्प व युरिया ब्रिकेटसचा वापर कसा करावा, निंबोळी अर्क, ट्रायकोकार्डचा वापर, कृषि विभागाच्या वेबसाईड्स, यु ट्युब चॅनल, व्हॉट्स अप ॲटो रिप्लाय, ब्लॉग, शेतकरी मासिक इत्यादी बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
तालुका कृषि अधिकारी धनराज तुमडाम यांनी सुधारित पध्दतीने भात लागवड, श्री पध्दत, पट्टा पध्दतीने भात लागवड कशी करावी व तुडतुड्याचे नियंत्रणावर मार्गदर्शन केले तसेच कृषि विभागाच्या विविध योजना व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेबद्दल माहिती दिली.
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) सुनिल खडसे यांनी कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र बारामती यांनी तयार केलेले कृषिक ॲप कसे डाऊनलोड करावे व त्याचे फायदे काय आहेत याबाबत सांगितले.
कृषि पर्यवेक्षक रविशंकर यांनी शेतकऱ्यांना प्रक्षेत्रावर नेवून ड्रम सिडरद्वारे भात लागवड कशी करतात याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले व ट्रायकोकार्ड लॅबला भेट देवून त्याचा वापर कसा करावा यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन मंडळ कृषि अधिकारी प्रशांत कलेवार यांनी केले. कार्यक्रमास कृषि पर्यवेक्षक वामन टेंभुर्णे व रविशंकर भगत, कृषि सहाय्यक रवि कुंभारे व तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी व शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.