आंध्रप्रदेश मध्ये झालेल्या बुध्दमुर्ती विटंबनेच्या प्रकाराने महाराष्ट्रामध्ये संताप

मिडिया वार्ता न्यूज
प्रतिनिधी
गुणवंत कांबळे
आंध्रप्रदेश- मधिल चित्तुर जिल्ह्यातील मदनापल्ली तालुक्यातील बुध्दकोंडा येथिल भगवान गौतम बुध्दांच्या मुर्तीची विटंबना तेथिल मनुवादी वृत्तीच्या समाजकंटकानी केली. ही घटना रविवार दिनांक २० जुन २०२१ रोजी घडली. सदर मुर्तीची स्थापना बुध्द आंबेडकर समाज नावाच्या युवकांच्या संघटनेने फेब्रुवारी २०२० मध्ये केली होती. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले असुन महाराष्ट्रातील बौध्दांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. काल सायंकाळी घाटकोपर माता रमाई नगर येथील गंधकुट्टी विहार मध्ये या विषयावर बैठक झाली होती.
आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये बौद्ध विचार आणि संस्कृतीचा प्रचार, प्रसार झपाट्याने होत असुन तेथिल युवक बुध्द आंबेडकरी विचारांने प्रभावित होत असल्याचे दिसत आहे, या गोष्टींची राग धरुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रणित मनुवादी वृत्तीच्या समाजकंटकानी हे कृत्य केले असल्याचे स्थानिकांमध्ये बोलले जात आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असुन,
*सदर बुध्दमुर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकाना त्वरित अटक करुन कायदेशिर कारवाई करावी, सदर बुध्दमुर्तीची नव्याने स्थापना करुन त्या परिसराची कायमस्वरुपी देखरेख करण्याची व्यवस्था करावी, या घटनेमागे असणाऱ्या शक्तींचा शोध लावुन त्यांच्यावर देखिल कारवाई करावी त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आंध्रप्रदेश च्या मुख्यमंत्र्यांशी कारवाई संदर्भात बोलणी करावी अन्यथा महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडले जाईल* असा ईशारा इंडियन सोशल मुव्हमेंटचे मुलनिवासी माला, यूनाइटेड रिपब्लिकन पर्टीचे अध्यक्ष तानसेन नानावरे, सेव रिजर्वेशनचे सुनील निरभवणे, सिद्धार्थ कांबळे, दादासाहेब यादव, जीवन भालेराव, जयभीम आर्मी चे कुणाल तुरेराव, वंचित बहुजन आघाडीचे रोहित जगताप, कोकण बुद्धिस्ट अलायंन्स आणि बांधिलकी चे प्रमोद सावंत, रुपेश पुरळकर इ. कार्यकर्त्यानी दिला
प्रमोद सावंत : 8291060530, 9137844161
मूलनिवासी माला : 9869010890