इंदापुर तालुक्यात सावकाराने एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत पेटवले, तरुणाचा मृत्यु.

57

इंदापुर तालुक्यात सावकाराने एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत पेटवले, तरुणाचा मृत्यु.

इंदापुर तालुक्यात सावकाराने एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत पेटवले, तरुणाचा मृत्यु.
इंदापुर तालुक्यात सावकाराने एका तरुणाला पेट्रोल टाकून जिवंत पेटवले, तरुणाचा मृत्यु.

✒️MVN क्राईम रिपोर्टर✒️
इंदापुर,दि.24 जुन:- इंदापुर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका सावकाराने आपल्या साथीदाराच्या मदतीने निमगाव केतकी येथील 27 वर्षीय तरुणाचे पैशासाठी अपहरण केले. नंतर पैशाच्या मोबदल्यात जमीन नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून त्या तरुणाच्या अंगावर पेट्रोल टाकत त्याला जिवंत जाळल्याची घटना जंक्शन इंदापूर फाॅरेस्ट हद्दीत घडली आहे. या घटनेत युवक 95 टक्के जळल्याने तीन दिवसांच्या उपचारानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याने आरोपींना तात्काळ बेड्या ठोकत जेरबंद केल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली.
नवनाथ हणुमंत राऊत वय 32 वर्ष, रा.निमगाव केतकी, ता.इंदापूर व सोमनाथ भिमराव जळक वय 31 वर्ष, रा.इंदापूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या आरोपीना 26 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर शिवराज उर्फ शिवराम कांतीलाल हेगडे वय 27, रा. निमगाव केतकी, ता.इंदापूर असे मयत इसमाचे नाव आहे.

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, सावकारकीच्या पैशासाठी एकाचा खून करून 302 च्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर असलेल्या 7 जुन 2021 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हा निमगाव केतकी हद्दीतील यशराज पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला असता वरील आरोपींनी फिर्यादीला पाठीमागुन बंदुक लावुन, चारचाकी वाहनात बसवत त्याचे अपहरण केले. व तुझ्याकडे आणखी पैसे निघतात असे म्हणून 13 दिवस अज्ञातस्थळी एका खोलीत डांबुन ठेवले. दि.20 रोजी वरील आरोपींनी फिर्यादी शिवराज उर्फ शिवराम हेगडे याला सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जंक्शन फाॅरेस्ट हद्दीत आणत त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत पेटवुन दिले आणि त्यानंतर आरोपी तिथून पसार झाले.

या घटनेत शरीर पेटल्यानंतर फिर्यादीने जमिनीवर लोळुन आग विझवली. व रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने नातेवाईकांना बोलावून घेतले. नातेवाईकांनी त्यांना इंदापूर उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. फिर्यादीच्या शरीराला जास्त भाजल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हील हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.तिथे त्यांच्यावर तीन दिवसांपासून उपचार करण्यात येत होते. त्यादरम्यान फिर्यादीने पोलिसांना लेखी जबाब दिला आहे.परंतु उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झाल्याने इंदापूर पोलिसांनी आरोपीवर 302 चा गुन्हा दाखल करून आरोपींना बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस करत आहेत.