*व्यापार्‍याकडे कापुसखरेदी चुकार्‍याचे १ कोटी ४० लाख थकीत* *१४७ शेतकरी अतिशय हलाखीच्या परीस्थितीत* *व्यापार्‍याने कानगांव येथील जनकेश्वर जिनिंगच्या परीसरातच गेल्या १२ एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या*

54

*व्यापार्‍याकडे कापुसखरेदी चुकार्‍याचे १ कोटी ४० लाख थकीत*

*१४७ शेतकरी अतिशय हलाखीच्या परीस्थितीत*

*व्यापार्‍याने कानगांव येथील जनकेश्वर जिनिंगच्या परीसरातच गेल्या १२ एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या*

हिंगणघाट दि.२४ जून
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कानगांव उपबाजार समिती येथील एका व्यापार्‍याने परीसरातील शेतकऱ्यांकडून कापसाची मोठी खरेदी केली.
एकुण १४७ शेतकर्‍यां कडुन तब्बल १ करोड ४० लाख रुपयाचे कापुस खरेदी केली असुन या दरम्यान सदर व्यापार्‍याने कानगांव येथील जनकेश्वर जिनिंगच्या परीसरातच गेल्या १२ एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
या दरम्यान व्यापार्‍याकडे कापुसखरेदी चुकार्‍याचे १ कोटी ४० लाख थकीत झाल्यामुळे एकूण १४७ शेतकरी अतिशय हलाखीच्या परीस्थितीतुन जात आहे.
अनेक शेतकर्‍यांकडे चालू हंगामातील शेती लागवडीसाठीआर्थिक अडचण निर्माण झाली असुन शिखरसंस्था असलेली कृषि उत्पन्न बाजार समितीसुद्धा प्रतिसाद देत नसल्याची तक्रार पिडीत शेतकर्‍यांनी केली आहे.
सदर फसवणुक झालेले शेतकरी आज दि.२४ रोजी माजी आमदार प्रा राजु तिमांडे यांच्या निवासस्थानी निवेदन घेऊन पोहचले होते , त्यांनी या वेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड सुधिर कोठारी यांचीही भेट घेतली.
परंतु आता त्यांचा कुणीही वाली असल्याचे दिसुन येत असून झालेल्या फसवणुकिमुळे शेतकरी नेत्यांच्या दारी भटकंती करतांना दिसुन येत आहे.सदर प्रकरणी शेतकरी हे अन्नदाते असल्याने त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता तसेच राष्ट्रवादी कांग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ता शाम इडपवार यांनी आंदोलन करण्याची तयारी दर्शविली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधिर कोठारी यांनी मात्र पीड़ित शेतकऱ्यांविषयी बाजार समितिची सहानुभूती असल्याची प्रतिक्रिया दिली असून शेतकऱ्यांनी उशिरा बाजार समितीकडे उशिरा तक्रार केल्याची माहिती दिली.