*तीन दिवसात 33668 नागरिकांचे लसीकरण*
*लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद*

*लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद*
✍️मनोज खोब्रागडे✍️
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961
भंडारा,दि.24:- शासनाने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरु केले असून लसीकरणास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात 45 वर्षावरील नागरिकांसाठी 21 व 22 जून रोजी विशेष मोहिम राबविण्यात आली. प्रशासनाच्या विशेष प्रयत्नामुळे गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यातील 33 हजार 668 नागरिकांचे आरोग्य विभागाने लसीकरण केले आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
21 जून रोजी 8318, जून 22 रोजी 8235 व 23 जून रोजी 17115 नागरिकांना लस देण्यात आली. यात 45 वर्षावरील नागरिकांचा व तरुणांचा विशेष सहभाग आहे.
लसीकरणात ज्या गावांचा प्रतिसाद कमी होता अशा ठिकाणी सोमवार व मंगळवारला विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेला जिल्हाभरात उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला असून दोन दिवसाच्या मोहिमेत 16 हजार 553 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे सर्व यंत्रणांनी यासाठी जिल्हाभर जनजागृती अभियान राबविले होते. याचाच परिपाक म्हणून जिल्ह्यात दोन दिवसात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले.
45 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आढावा बैठकीत दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाने 21 व 22 जून रोजी जिल्ह्यात विशेष लसीकरण अभियान राबविले. या अभियानाला पात्र लाभार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
21 जून रोजी 8318 नागरिकांनी लस घेतली यात 7616 नागरिकांनी पहिला तर 702 नागरिकांनी दुसरा डोस घेतला. आज 22 जून रोजी 18 ते 44 वयोगटातील 2649 तर 45 वर्षावरील 5586 अशा एकूण 8235 नागरिकांनी लस घेतली. यात 7572 नागरीकांनी पहिला डोस तर 663 नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला.
23 जून रोजी जिल्ह्यात 17 हजार 115 नागरिकांनी लस घेतली. यात 18 ते 44 वयोगटातील 16 हजार 268 व 45 वर्षावरील 847 नागरिकांचा समावेश आहे. 16 हजार 558 व्यक्तींनी पहिला तर 557 व्यक्तिंनी कोविड लसीचा दुसरा डोज घेतला. यात 8723 पुरुष तर 8392 महिला आहेत. अशा एकूण 17115 व्यक्तींना 23 जूनला लस देण्यात आली.
18 वर्षावरील नागरिकांचे जिल्हाभरात विविध केंद्रावर लसीकरण सुरू आहे. यात ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. लाभार्थ्यांनी गर्दी न करता व कोविड नियमांचे पालन करून लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके व समन्वयक डॉ. माधुरी माथूरकर यांनी केले आहे.