*नगराध्यक्षांच्या खुर्चीला नगरसेवकांनी घातला चप्पलाचा हार

78

 

वर्धा आर्वी :- वर्धा जिल्हातील आर्वी नगर पालिकेत आज नगराध्यक्षांच्या खुर्चीला चप्पलाचा हार आणी बेसरमाचे रोपटे ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आर्वीत माघील अनेक दिवसा पासून अस्वच्छता आणी घाणीच साम्राज्य दिसून येत आहे. काही नगर सेविकांनी नगरपालिकेत एकत्र येउन नगराध्यक्षांच्या खुर्चीला चपलांचा हार घालुन नगराध्यक्षांचा नीषेध केला.
शहरांमध्ये ठिक ठिकाणी कचरा साचला असुन सर्वत्र दृर्गंधयुक्त वातावरण आहे. त्यांंमूळे शहरातील नागरिक साथीचा बिमारीचा भयाखाली जगत आहे. त्यांमुळे वार्डातील नागरिक या सन्दर्भात नगरसेवकांना वेठीस धरतात. त्यांमुळे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी स्वता:च्या पक्षाचा नगराध्यक्षा विरोधात हे पाऊल उचलले आहे.
यापूर्वी दोन वेळा वेगवेगळ्या ठेकेदारांंना नगरपालीके द्वारा शहर सफाईचे कंत्राट देण्यात आले पण नगरसेवकांनी आपेक्ष घेतल्यामुळे ते कंत्राट रद्द झाले. त्यांमुळे सध्या सफाईचे कंत्राट कुणाकडे नाही. त्यांमुळे आज शहरांमध्ये अस्वच्छता, दृर्गधी, रोगराही चा बोजवारा उडालेला आहे. विशेष बाब म्हणजे 23 सदस्यांच्या आर्वी नगर पालिकेच्या 23 नगरसेवक हे भाजपा पक्षाचे आहे. भाजपा ची एका हाती सत्ता आहे. त्यांमुळे सर्वीकडे आश्यर्य व्यक्त केले जात आहे.
आर्वी नगर पालिकेचे आरोग्य सभापती गंगा चकोले, गटनेता प्रशांत ठाकुर भाजपा शहर अध्यक्ष व नगरसेवक जगन गाठे, प्रकाश गुल्हाने, सुनील वाजपेयी, मिथुन बारबैले, कैलाश गळहाट, रामू राठी, अजय कट्टमवार, उषा सोनक्कटे, कान्ताबाई कसार नगरसेवक उपस्थीत होते.