राजर्षी छत्रपती शाहू

53

राजर्षी छत्रपती शाहू

राजर्षी छत्रपती शाहू

बलदंड छत्रपती माझे शाहू!
परोपकारी विशाल त्यांचे बाहू!

भीमास देऊनी मैत्रीचा हात!
आरक्षणाची केली सुरुवात!
विषमतेला मारली लाथ!
समतेची केली बात!
तेंव्हा…
अचंबित होऊन सारेच
एकमेका लागले पाहू!
बलदंड छत्रपती माझे शाहू!
परोपकारी विशाल त्यांचे बाहू!

रयतेचा केला सांभाळ!
स्वतःचे समजून बाळं!
आनंदाची रोज सकाळ!
रयतेचा होता सुकाळ!
तेंव्हा…
भटशाहीचा विनाशकाळ
जवळ लागला येऊ!
बलदंड छत्रपती माझे शाहू!
परोपकारी विशाल त्यांचे बाहू!

संबोधिले जनता!
सोडा चिंता!
भीमरावचं आहेत तुमचे नेता!
भाग्यवान तुम्ही तेंव्हाच झाले!
भीम जेंव्हा जन्मास आले!
तेंव्हा…
आनंदाश्रू सर्वांच्या
डोळ्यातून लागले वाहू!
बलदंड छत्रपती माझे शाहू!
परोपकारी विशाल त्यांचे बाहू!

शाहूंचे भाकीत खरे ठरले!
भीमाने अवघ्या देशा तारले!
समस्त जणांचे हित हेरले!
संविधान रुपी शिल्प कोरले!
तेंव्हा…
मतांचे राजे आनंदाने
लागले नाचू गाऊ…अन
लोकशाहीचे वारे साऱ्या
देशात लागले वाहू!
बलदंड छत्रपती माझे शाहू!
परोपकारी विशाल त्यांचे बाहू!

कवी/लेखक
सुमेध मधुकर सोनावणे
9967162063