जिल्ह्यात सोमवारपासून निर्बंधांमध्ये वाढ

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा: -26/06/2021कोरोनाच्या डेल्टा प्लसचा वाढलेला धोका व काही जिल्ह्यामध्ये वाढ असलेले रुग्ण लक्षात घेऊन राज्य शासनाने निर्बंधांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगानेच जिल्हाधिकारी यांनी शनिवारी निर्बंधांमध्ये वाढ करणारा नवीन आदेश जारी केला. हा आदेश सोमवार 28 जून रोजी सकाळी 7 पासून लागू होणार आहे. सर्व दैनंदिन व्यवहार, जीवनावश्यक आणि बिगर जीवनावश्यक दुकाने आता सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची मुभा आहे. शनिवारी व रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व बंद राहणार आहे.
रास्त भाव दुकानांना परवानगी
जिल्ह्यातील रास्त भाव दुकाने व चष्म्यांच्या दुकानांना सातही दिवस परवानगी राहील. ही दुकाने सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरू ठेवता येतील.
उपाहारगृहांना दुपारी 4 पर्यंत मुभा
हॉटेल, रेस्टॉरंट व बार, खानावळ, शिवभोजन थाळी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्क्याने सुरू राहील. शनिवारी व रविवारी त्यांना घरपोच सेवा द्यावी लागेल.
बाह्य मैदानी खेळाला परवानगी
सार्वजनिक ठिकाणे, क्रिडांगणे, मोकळ्या जागा, मॉर्निंग वाक, सायकलिंग, बाह्य मैदानी खेळ सकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत सुरु राहील. आंतर मैदानी खेळाला परवानगी नाही.