अमरावतीत शिवसेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या, 4 जणांना अटक.

51

अमरावतीत शिवसेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या, 4 जणांना अटक.

अमरावतीत शिवसेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या, 4 जणांना अटक.
अमरावतीत शिवसेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या, 4 जणांना अटक.

✒मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
अमरावती, 27 जून :- अमरावती येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. आज अमरावती जिल्हात मोठ्या प्रमाणात क्राईम वाढत असल्याचे समोर येत आहे. अश्याच एका घटनेमुळे अमरावती हदरल. मात्र, राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी राजकीय पदाधिकारी यांची हत्या झाल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा शहरातील आशिर्वाद वाईन बारसमोर रात्री 5 जणांनी शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या केल्याची घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार, अमरावती जिल्हातील तिवसा शहरात रात्री 10.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पाच जणांच्या टोळक्याने अमोल पाटील वय 34 वर्ष यांच्या वर हल्ला केला आणि हत्या केली. अमोल पाटील हा मित्रासोबत बारमध्ये आला होता. पण बार बंद झाल्याने अमोल पाटील व त्याचा एक मित्र बारसमोर बसले होते. बारसमोर दारू पित असल्याची संधी साधून 5 आरोपींनी अमोल पाटील यांच्या हल्ला चढवला. डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केलं.

या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली तर 1 आरोपी फरार आहे. धक्कादायक म्हणजे, अमोल पाटील याच्यावर याआधी दोन हत्याचा आरोप होता. त्याला दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्याबाहेर तडीपाराचा आदेश देखील काढला होता. ही हत्या अवैध धंद्यातून झाली असल्याची चर्चा आहे.