आरोग्य विभागाची ईमारत बनली शेळ्यांचा गोठा
टेकामांडवा येथील प्रकार ..
शासन व आरोग्य विभागाचे दूर्लक्ष

टेकामांडवा येथील प्रकार ..
शासन व आरोग्य विभागाचे दूर्लक्ष
संतोष मेश्राम
राजुरा तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob : 9923497800
चंद्रपूर जिल्ह्यातील अती दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सद्दस्तीतीत पशुवैद्यकीय दवाखान्याचे स्वरूप प्राप्त झाले असून आता तिथे चक्क लोकांनी बकऱ्या व मेंढ्या बांधायला सुरुवात केली आहे असे चित्र दिसून येत आहे
मागील पाच ते सहा वर्षांपूर्वी आदीवासी व अतीदूर्गम अशा आदीवासी बहूल प्रदेशातील लोकांच्या स्वास्त विषयक समस्या निकाली निघाव्यात प्रत्येक नागरिकाला आरोग्य विषयक योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्राथमिक आरोग्य केद्राची स्थापना करण्यात आली मात्र तेव्हापासून कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय अधिकारी व इतर अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली नाही लाखो रुपये खर्च करून हि ईमारत ऊभी करण्यात आली रितसर उद्घाटन ही करण्यात आले परंतु आरोग्य केंद्राला अधीकारी गवसलास नाही बांधकाम करण्यात आलेली इमारत जिर्ण होत आली नागरीकांनी याचा फायदा घे त्या ईमारतीत शेळी व मेंढी बांधायला सुरुवात केली टेकामांडवा या परीसरातील अनेक गावांतील लोकांचे आरोग्य विषयक समस्या चे निराकरण व्हावे प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभावे या करीता परीसरातील नागरीकांना गडचांदूर जिवती या ठिकाणी धाव द्मावी लागतं आहे ….तरी लवकरात लवकर टेकामांडवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे अशी विनंती गावकऱ्यांनी केली आहे