महाविकास आघाडीत बिघाडी; कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये राजकारण गरम.

50

महाविकास आघाडीत बिघाडी; कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये राजकारण गरम.

महाविकास आघाडीत बिघाडी; कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये राजकारण गरम.
महाविकास आघाडीत बिघाडी; कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये राजकारण गरम.

✒️लियाकत मदारी कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी✒️
कोल्हापूर,दि.27 जुन:- चार वर्षापासून कोल्हापूर मधिल जिल्हा परिषदेत मध्ये महाविकास आघाडी सर्व ठिक सुरु असताना आता अध्यक्षपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात वातावरण चांगलच तापल आहे. जिल्हा परिषदच्या बजरंग पाटील यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या जागेसाठी दोन्ही पक्षाकडून आग्रह सुरू झाला आहे. यामुळे आता जिल्ह्याचे लक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या निर्णयाकडे लागले आहे.

माघील चार वर्षापुर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येत भाजपची सत्ता संपुष्टात आणली. त्यामध्ये अध्यक्षपद काँग्रेस, उपाध्यक्षपद राष्ट्रवादी आणि तीन सभापतीपदे शिवसेनेला देण्यात आली. सव्वा वर्षानंतर पदाची अनेकांना संधी देण्यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सर्वांनी राजीनामे दिल्याने सध्या सर्वच पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी जुलै महिन्यात निवड होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. गेल्यावर्षी ठरल्याप्रमाणे अध्यक्षपद राष्ट्रवादीलाच मिळणार, असा दावा ग्रामपविकास मंत्री मुश्रीफ यांनी केला आहे. दुसरीकडे काँग्रेनेही या पदावर आग्रह धरला आहे. सरीता खोत, राहुल पाटील यांची नावे यासाठी स्पर्धेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने युवराज पाटील, जयवंत शिंपी आणि विजय बोरगे हे अध्यक्ष होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बांधकाम, शिक्षण, अर्थ ही सभापतीपदे शिवसेनेला देण्यात येणार आहेत.