चंद्रपुर जिल्हात बोगस बियाण्याची भरमार, एक लाख 29 हजारांचे बोगस बियाणे जप्त.

49

चंद्रपुर जिल्हात बोगस बियाण्याची भरमार, एक लाख 29 हजारांचे बोगस बियाणे जप्त.

चंद्रपुर जिल्हात बोगस बियाण्याची भरमार, एक लाख 29 हजारांचे बोगस बियाणे जप्त.
चंद्रपुर जिल्हात बोगस बियाण्याची भरमार, एक लाख 29 हजारांचे बोगस बियाणे जप्त.

✒धीरज चौधरी, चंद्रपुर प्रतिनिधी✒
चंद्रपुर,दि.27 जुन:- चंद्रपुर जिल्हातील राजुरा तालुक्यातील मौजा वरोडा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपुर जिल्हातील ग्रामीण भागात सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात बियाण्याची उचल करुन आपल्या शेतात पेरणी करत असल्याचे चित्र सर्वीकडे दिसून येत आहे. पण काही बियाणे व्यवसायीक या संधीचा लाभ घेत आपला नफा आणि शेतकरी भकास झाला पाहिजे असे काम करत असल्याचे समोर आले आहे.

चंद्रपुर जिल्हातील राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना माहिती मिळाली होती की एका स्थिकानी मोठ्या प्रमाणात नकली बियाण्याची विक्री होत आहे. यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता त्यांना सादुजी गणुजी नांदेकर यांच्या शेतातील घरी बोगस बियाणे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सदर ठिकाणाची पाहणी केली असता सुभाष विठ्ठल तुम्मेवार वय 45, रा. रामपूर यांनी चार पोते बोगस बियाणे शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. या चार पोत्यांत कोहिनूर 555 वाणाची 450 ग्रॅमची 47 पॅकेट, शक्तिगोल्ड वाणाची 450 ग्रॅम वजनाची 47 पॅकेट, जादू वाणाची 450 ग्राम वजनाची 33 पॅकेट, आर-659 वाणाची 450 ग्रॅम वजनाची 31 पॅकेट, अशा प्रकारे एकूण एक लाख 29 हजारांचे बोगस बियाणे जप्त करण्यात आले. सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक झुरमुरे, पोलीस उपनिरीक्षक गेडाम, पोलीस शिपाई संघपाल गेडाम, अविनाश बोबडे, दिनेश मेश्राम, महिपत कुमरे, नारायण सोनुने, महेश माहूरपवार, कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी जी. डी. मोरे, तालुका कृषी अधिकारी व्ही. के. मकपल्ले, मंडल कृषी अधिकारी सी. के. चौहान, कृषी पर्यवेक्षक नितीन कांबळे यांनी केली.