रिपब्लिकन पक्ष खोरिप चा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाक्षणिक उपोषणाचा इशारा (मुंबई)लौकडाऊनच्या काळात राज्यात अनुसूचित जाती जमाती, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच महिलांवर झालेल्या अत्याचाराची प्रकरणे वाढत आहेत नागपूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता अरविंद बनसोड याची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मयुरेश उमरकर याने हत्या केली आहे , पिंपरी-चिंचवड येथील पिंपळे सौदागर येथील विराज जगताप ह्या तरुणाने उच्च जातीच्या मुलीवर प्रेम केले म्हणून त्याची हत्या करण्यात आली आहे तसेच विविध जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती जमाती, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच महिलांवर झालेल्या अत्याचाराची प्रकरणे वाढत आहेत नागपूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी एका दुरदर्शनच्या वाहिनीवर प्रसारित करण्यात आली होती राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे याची जबाबदारी घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा तसेच अनुसूचित जाती जमाती, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर अनु जाती जमाती अत्याचार प़तिबधंक कायद्यानुसार कारवाई करावी व ह्या घटनांमध्ये जलदगती न्यायालयात खटले चालवण्यात यावेत,ज्या गावात ह्या अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत त्या गावात,त्या पिडित कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात यावे व पिडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी व न्यायालयात ह्या अत्याचाराच्या घटनांमध्ये पिडित कुटुंबाच्या बाजूने लढण्यासाठी तज्ञ व अनुभवी वकील नेमण्यात यावेत, परदेशी उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणार्या अनुसूचित जाती तसेच बौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेबाबत सुधारित परिपत्रक काढण्यात यावे व त्यात उत्पन्नाची मर्यादा रद्द करण्यात यावी, तसेच गेल्या १५ वर्षापासून बंद करण्यात आलेल्या अनुसुचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजना व मोफत ( फ़िशीप) शिक्षण योजना पुन्हा सुरू करण्यात यावी,बढतीतील आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिनराहून खुल्या प्रवर्गातील अधिकारी कर्मचारी यांचे प्रमाणे अनुसूचित जाती जमाती भटक्या जाती विमुक्त जमातींच्या अधिकारी कर्मचारी यांना सुद्धा बढती देण्यात यावी यासाठी परिपत्रक काढण्यात यावे, भरती बढती मधील राखीव जागांचा अनुषेश भरण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती जमाती, भटक्या जाती विमुक्त जमातींच्या बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी देण्यात येत असलेले कर्ज सुविधा सुलभतेने उपलब्ध करून देण्यात यावीत, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सन्मान योजनेअंतर्गत राज्यात किती कुटुंबाना जमीन वाटत करण्यात आली आहे याची माहिती द्यावी ,महार वतनी जमीनीचे मोठ्या प्रमाणात गैरहस्तांतरण झाले आहे त्या गैरहस्तांतरीत जमीनी पुन्हा मुळ वतनदार यांना परत कराव्यात किंवा त्याचा योग्य मोबदला देण्यात यावा, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करू नये आदी विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभरात विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी यांना रिपब्लिकन पक्ष खोरिपच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने दि १८ जून,४ औगस्ट,१५ औगस्ट रोजी स्वातंत्रदिनी देण्यात आले आहेत मात्र अद्यापही राज्य सरकारने तातडीने कारवाई केली नाही त्यामुळे आता विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दि ७ सप्टेंबर २०२० रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय रिपब्लिकन पक्ष खोरिप चे राष्टीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे यांनी घेतला आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्ष खोरिप महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी दिली आहे
Home latest News *रिपब्लिकन पक्ष खोरिप चा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाक्षणिक उपोषणाचा इशारा*