पंचशील SRA बिल्डींग गोवंडी मध्ये राहत असलेल्या इथल्या रहिवाशांची सभासदांची फसवणूक”

65

पंचशील SRA बिल्डींग गोवंडी मध्ये राहत असलेल्या इथल्या रहिवाशांची सभासदांची फसवणूक”

पंचशील SRA बिल्डींग गोवंडी मध्ये राहत असलेल्या इथल्या रहिवाशांची सभासदांची फसवणूक”
पंचशील SRA बिल्डींग गोवंडी मध्ये राहत असलेल्या इथल्या रहिवाशांची सभासदांची फसवणूक”

गेली अनेक वर्षे म्हणजे साधारण २५वर्ष या वसातील लोक किंवा इमारतीमधील रहिवाशी इथे होते असलेल्या गैरसोयी व गलिच्छ पणाचे राजकारण अश्या अनेक समस्यांना तोंड देत आहे आपल्या हक्कासाठी लढा देत आहे. तरी अद्याप रहिवाशांना योग्य तो न्याय मिळाला नाही त्यामुळे पंचशील गोवंडी SRA गृहनिर्माण संस्था या संस्थेतील पिडीत रहिवाशी किंवा सभासद यांच्या न्याय Right to shelter अर्थात निवारा हक्क समितीचे संस्थापक अध्यक्ष ऍड.संतोष सांजकर साहेब यांना पिडीत सभासदांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.

कामगार वसाहत गौतम नगर गोवंडी.” अशी ओळख असलेल्या या वसाहतीचे पुनर्वसन( pawar vasan ) सण १९९५ पासून करण्याचे ठरवण्यात आले . तरी या प्रकल्पाला २००६ पासून कामकाज सुरुवात झाली. या प्रकल्पात२०११ ला शासनाच्या रस्ते बांधीत प्रकल्पामध्ये ८८ झोपडीधारक हे रोड बांधीत म्हणजेच रोड कटिंग मध्ये नोंद करण्यात आले. व त्यांना MMRD यांच्या करारनामा सहित तात्पुरता स्थलांतर म्हाडा मध्ये करण्यात आले. तरी हे सर्व प्रकल्प पूर्ण होईपर्यंत सण २०१७ म्हणजेच तबल १२ ते १४ वर्ष इथल्या रहिवाशांना वाट पाहावी लागली.

या कालावधी मध्ये देखील गलिच्छ राजकारण करून अनेक नको ते प्रसंग निर्माण करून पंचशील गृहनिर्माण च्या विकासासाठी आठकारी घालून इथल्या रहिवाशांना अनेक वर्ष बाहेर ठेवण्यात आले. त्यातही अनेक रहिवाशांना सभासदांना योग्यत्या रित्या घरभाडे सुद्धा दिले जात नव्हते. तसेच अनेक कागद पत्रांमध्ये सुद्धा फेरफार करण्यात येत होते.अशा अनेक प्रसंगाला इथले रहिवाशी तोंड देत होते . आणि अजून ही देत आहेत.

२०१७ मध्ये मात्र लोकांची लॉटरी काढून निकृष्ठ दर्जाच्या इमारती मध्ये (of occupational certificate ) न देता झोपडी धारकास घर देण्यात आले . त्या मध्ये पण पात्र व अपात्र अशी रहिवाशांची योग्यता करण्यात आली.अपात्र रहिवाशांना पात्र करण्यासाठी स्वह खर्ची ते बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत करण्यात येत असून प्रत्येकी रहिवाशांकडून ३ ते ४ लाख खर्च सांगितला जातो.

तसेच रोड प्रकल्प बांधीत लोकांना२०११ च्या करारनामा नुसार आज MMRDA मध्ये १० वर्ष होऊनसुध्दा त्यांच्या हक्काचा घरामध्ये पूर्णतः विकसीत केलेले नाही.कामगार वसाहत म्हणजे पंचशिल गृहनिर्माण संस्थेच्या ३ इमारती असताना देखील फक्त? एका इमारतीचे बांधकाम पुर्ण करून दुसऱ्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होतच तो इमारत झोपडीधारक रहिवाशांना न देता खाजगी विक्रीसाठी काढण्यात आली असून इथल्या ८८ रूम धारक रहिवाशी व इतर रहिवाशी संभ्रमात आहेत की आम्हाला “आमचे हक्काचे घर कधी मिळणार ,की नाही मिळणार”.

तसेच आता राहत असलेल्या इमारतीचे बांधकाम निष्कुष्ठ दर्जाचे असून अगदी एका वर्षातच संपुर्ण इमारतीमधील घरा घरा मध्ये पाण्याची गळती होण्यास सुरुवात झाली. तसेच पिण्याचे पाणी असलेली टाकी ही रहदारीच्या मुख्य आवारात असुन पावसाळ्यामध्ये घाणीचे पाणी त्यात मिसळते. सोसायटी मेन्टेन्सच्या नावासाठी प्रत्येक घरमालकाकडून १०००रुपये मासिक मेन्टेनेस काढला जातो.तरी देखील या इमारतीमध्ये निष्कृष्ठ दर्जाचे पाणी आणि अनधिकृत पिण्याचे पाण्याचे पाईपलाईन जोडलेले आहे.

प्रत्येक झोपदीधारकाच्या नावाखाली ४०,००० रुपये फंड पास करण्यात आलेला आहे. परंतु नियोजित सोसायटी सभासदांनी याचा ठाम पत्ता लागू देत नाही नियोजित सोसायटी यांना २०१७ पासून ते २०२० ते २०२१ पर्यंत ५ वर्षांच्या कालावधीत लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी एक ही वार्षिक सर्वसाधारण सभा मिटींग घेण्यात आलेली नाही.

तसेच संस्था उभारण्यात आलेली इमारत मध्ये कोणत्याही मुख्य सुविधा अद्यापही नसुन येथे राहत असलेल्या रहिवाशांची ही गैरसोय असून अनेक प्रसंगाना बळी पडत आहे. इमारतीच्या मुख्य आवारात लोखंडी गेट नाही. पिण्याचे पाणी टाकीची योग्य रित्या व्यवस्था नाही.गटार लाईन योग्य रित्या बांधकाम नाही.सांडपाण्याची निट व्यवस्था नाही इमारती आवारात रहिवाशांच्या गाड्यांसाठी योग्य रित्या पार्किंग नाही किंवा लहान मुलांना खेळण्यास कोणतेही गार्डन नाही.वृद्ध लोकांना बसण्यासाठी व्यवस्था नाही इतकेच नव्हे तर इमारतीच्या मधल्या आवारात जाता-येता येत असताना २३ मजल्याची असलेली इमारत या इमारतीच्या कोणत्याही मजल्यावरून इतक्याउंचा वरून लोकांच्या अंगावर डोक्यावर कचरा पाणी इतकेच नाही तर लाखड, सळी, मोठ्या परात, दगडी, विटा असे अनेक वस्तू पडल्या जातात.इमारतीला जर आग लागली तर ती आग विजविण्यासाठी सुध्दा योग्य रित्या सोय नाही .साफसफाई नाही अशा अनेक समस्यांना इथल्या रहिवाशांना सामोरी जात आहे.

अशा अनेक प्रसंगांना लोकं त्रस्त झालेली असून देखील यावर अद्याप बाहेर असलेल्या ८८ रहिवाशांना न्याय मिळत नसुन या सर्व समस्या दूर करण्यासाठी Right to shelter चे संस्थापक अध्यक्ष ऍड.मा. संतोष सांजकर साहेब आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी गोंवडी पंचशिल गृहनिर्माण संस्थेचे नियोजित अध्यक्ष शरद कांबळे आणि त्यांची कार्यकरणी मंडळ तसेच विकासक अनवर भाई लकडावाला यांना रहिवाशांच्या सर्व समस्या ७ दिवसाच्या आत मध्ये पूर्ण न झाल्यास कायदेशीर रित्या उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. या प्रकल्पामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहत असून बौद्ध बांधवांनचे २०००.sq fit असलेले बुध्द विहार बांधून देण्याचे आश्वासन दिले होते ते देखील अद्याप बांधून देण्यात आले नाही.
त्यामुळे पंचशिल गृहनिर्माण सभासद रहिवाशांनी यांनी ऍड.मा.संतोष सांजकर यांना यासर्व समस्यांची पाहणी करून त्यावर योग्य तो रित्या विकास व्हावा. या संपूर्ण सहभागी असलेले पंचशिल गृहनिर्माण संस्थेतील सभासद रहिवाशी बाहेर असलेले ८८ लोकं तसेच रविंद्र जाधव, रोहित जाधव, कोमल जाधव, प्रियंका मर्चडे,प्रज्ञा मर्चंडे,वैशाली जाधव, संजय कदम,रेखा कदम,आरती जाधव, किर्तीध्वज जाधव, नितीन कोलंबेकर, श्रेयस जाधव, आश्विनी जाधव, अमर साळवे, योगिता साळवे, सम्यक जाधव आशा मर्चडे,कुंदन लोंडे उपस्थित राहून यांनी अथल परिश्रम घेतले.