पुरोगामी महाराष्ट्र हादळला: हुंड्यासाठी विवाहीतेचा छळ, मुलीची आत्महत्या, सासू सासरे 3 वर्षांच्या मुलाला घेऊन फरार.

54

पुरोगामी महाराष्ट्र हादळला: हुंड्यासाठी विवाहीतेचा छळ, मुलीची आत्महत्या, सासू सासरे 3 वर्षांच्या मुलाला घेऊन फरार.

पुरोगामी महाराष्ट्र हादळला: हुंड्यासाठी विवाहीतेचा छळ, मुलीची आत्महत्या, सासू सासरे 3 वर्षांच्या मुलाला घेऊन फरार.
पुरोगामी महाराष्ट्र हादळला: हुंड्यासाठी विवाहीतेचा छळ, मुलीची आत्महत्या, सासू सासरे 3 वर्षांच्या मुलाला घेऊन फरार.

औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी

औरंगाबाद,दि.29 जुन:- एका खळबळजनक घटनेने पुरोगामी महाराष्ट्र हादळला आहे. त्यामुळे सर्वीकडे संतापाची लाट दिसून येत आहे. आजही 21 दशकात पुरोगामी महाराष्ट्रात हुंड्यासाठी विवाहित मुलींचा छळ केला जातोय. या छळापाई आजही महाराष्ट्राच्या लेकी स्वत:ला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेताना दिसत आहेत. हे मोठ दुर्दवी आहे. औरंगाबादेत एका विवाहितेने हुंड्यासाठी सतत सासरच्यांकडून सुरु असणाऱ्या छळाला कंटाळून अखेर आत्महत्या केलीय. विशेष म्हणजे तिच्या आई-वडिलांनी लग्नाच्यावेळी सासरच्यांना मोठ्या प्रमाणात हुंड्यासह सोनंही दिलं होतं तरिही एका निष्पाप विवाहिने आपली जीवनयात्रा संपवी लागली यापेक्षा मोठ दुर्दव्य काय अशु शकते.

औरंगाबाद येथे सासरच्या मंडळींच्या सततच्या त्रासाला छळाला कंटाळून विवाहीतेने विष प्राशन करुन आत्महत्या केली. आपल्या सुनेने आत्महत्या केल्याचे कळताच तिच्या सासरची मंडळी पीडितेच्या 3 वर्षांच्या मुलाला घेऊन फरार झाले आहेत. याप्रकरणी औरंगाबाद येथील वेदांत नगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच मृतक महिलेच्या पतीसह इतर कुटुंबियांवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार वर्षांपूर्वी मृतक कांचन हीचा विशाल राठोड नावाच्या तरुणासोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर काही दिवस अगदी आनंदात गेले. कांचनच्या आई वडिलानी वर पक्षाला लग्नाच्यावेळी हुंड्यासह सोनंदेखील दिलं होतं. मात्र, तिच्या सासरच्यांनी लग्नानंतरही आणखी हुंड्याची मागणी केली. हुंडयाचा राक्षस शिरल्याने तिला सतत शारीरिक आणि मानसिक छळ सुरु झाला. तरीही कांचनने आपल्या 3 वर्षच्या मुलाला पाहुन अनेक वर्ष हे सगळं सहन केलं. पण सासरच्यांकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने अखेर टोकाचा निर्णय घेतला. संबंधित घटना ही 25 जूनला घडली. पीडितेच्या आत्महत्येनंतर तिचा पती विशाल राठोडसह इतर सासरची मंडळी फरार आहेत.

सासरचे पीडितेच्या मुलाला घेऊन फरार
कांचनने विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिने विष प्राशन केल्याची माहिती तिच्या माहेरच्यांना मिळाली. त्यांनी तातडीने पीडितेला औरंगाबाद येथील एका रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारादरम्यान तिचं निधन झालं. तिच्या मृत्यूनंतर सासरचे मंडळी पीडितेच्या तीन वर्षाच्या बाळाला घेऊन फरार झाले. त्यानंतर पीडितेच्या माहेरच्यांनी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
आरोपींविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी पती विशाल राठोड याच्यासह सासरच्या तीन जणांविरुद्ध गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेला चार दिवस उलटून गेले असले तरी आरोपी मात्र अद्याप फरार आहेत.