कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने मोठ्या प्रमाणात वाढवली चिंता.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी ✒
मुंबई,दि.29 जुन:- महाराष्ट्र राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने मोठ्या प्रमाणात चिंता वाढवली आहे. त्यामुळे परत एक दा टाळेबंदी होते की काय अशी शंका आम जनतेच्या मनात येत आहे. काल दिवसभरात देशात 46 हजार 148 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर 58 हजार 578 जणांनी कोरोनावर मात केलीय. 979 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर 5 लाख 72 हजार 994 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली कोरोना वायरस बाधित रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
तरी महाराष्ट्र शासनाने कोरोना वायरस आणि डेल्टा प्लस वायरसच्या प्रादुर्भाव बघता काही उपाययोजना आणि निर्बंध लागू केले आहे. या निर्बंधाचे जनतेने काटेकोर पालन करावे अशी प्रशासन विनंती करत आहे.