डोंगरगांव आदीवासी शेतकरी राज्यस्तरीय पीक स्पर्धेत तीसरा
मुख्यमंत्राच्या हस्ते होणार सन्मान

मुख्यमंत्राच्या हस्ते होणार सन्मान
✒ राजू झाडे✒
गोडपीपरी प्रतीनीधी
मो नं 9518368177
एकीकडे शेती परवडण्यासारखी नाही खर्च वजा करता काहीच उरत नाही असी सातत्याने होणारी शेतकऱ्यांची ओरळ तर दुसरीकडे डोंगरगांव येथील देवराव शेडमाके नामक व्यक्तीने हेक्टरी ४१ कींटल हरभरा पिकुन परीश्रमाला कौशल्याची जोड दिली योग्य मार्गदर्शनात मेहनत केली तरं शेतकऱ्यांवर निश्चीत चे आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही हे आपल्या प्रत्यक्ष कृती तुन शीध करणाऱ्या डोंगरगांव येथील देवराव शेडमाके या आदीवासी शेतकऱ्यांने रब्बी हंगाम पिक स्पर्धेत राज्य स्तरावर तिसरा क्रमांक पटकावत डोंगरगांव चे नाव मोठे केले आहे
शेतकऱ्यांमध्ये शेती उत्पादनाची चुरस निर्माण व्हावी या उद्देशाने राज्य शासनाने राज्यस्तरीय रब्बी हंगाम पिक स्पर्धा घेतली स्पर्धा करीता तालूका ते राज्य स्तरावर दोन गट शेतकऱ्यांचे बनवण्यात आले पहीला गट सर्व साधारण शेतकऱ्यांचा तर दुसरा गट आदीवासी शेतकऱ्यांच्या बणवीण्यात आला … स्पर्धेकरीता तालूक्यातून कीमाण पाच स्पर्धक सहभागी झाल्याशीवाय समंधीत तालूका स्पर्धेकरीता पात्र होणारं नव्हता ही अट होती डोंगरगांव च्या कर्तृत्ववान कुशी सहायक कल्पना चौधरी यांनी दुर्गम अशीक्षीत आदीवासी समाजातील शेतकरी या स्पर्धेकरीता समोर यावे म्हणून सातत्याने त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले … स्पर्धेत निकाल घोषित झाल्यानंतर नागपूर महसूल विभागाच्या क्रुषी सह संचालक .. चंद्रपूर चे जिल्हा कृषी अधिकारी तथा अधीक्षक वराटे साहेब तालूका क्रुषी अधीकारी मंगेश पवार यांनी देवराव शेडमाके व साईनाथ मडावी यांची भेट घेऊन त्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला