आमदार सूधिर मुनगंटीवाराकडून पत्रकाराना फेस शिल्ड तथा मास्कचे वितरण

✒ राजू झाडे ✒
गोंडपीपरी प्रतीनीधी
मो नं 9518368177
कोरोनाकाळात पत्रकारांनी महत्वाची भुमिका बजावली.टाळेबंदीत गाव ,गावे कुलूप बंद झाली असतांना जिवाची पर्वा न करता पत्रकार सर्वसामान्याचे दुख लेखणीतून मांडत होता.अनेक पत्रकारांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला तर अनेक बाधित झाले.पत्रकार खरा कोरोना योध्दा ठरला मात्र शासन दरबारी तो उपेक्षितच राहीला.अश्यात समाजासाठी धडपडणार्या पत्रकारांनी स्वताची आणि कुटूंबाची काळजी घ्यावी असा मोलाचा संदेश देत आमदार मुनगंटीवार यांनी पत्रकाराना फेस शिल्ड तथा मास्कचे वितरण केले.मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपा गोंडपिपरीचा पदाधिकार्यांनी छोट्याखाणी कार्यक्रमात पत्रकाराना कोरोना किटचे वितरण केले.
गोंडपिपरी येथे भाजपा तर्फे पत्रकारांना फेस शिल्ड आणि मास्कचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन भाजपा नेते निलेश संगमवार यांनी केली.गोंडपिपरी तालुक्यात पत्रकारांनी बजावलेल्या कार्याची उजणी संगमवार यांनी केली.जिवावर बेतून तालुक्यात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडी पत्रकार देत होते,असेही संगमवार म्हणाले.यावेळी मंचावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बबन निकोडे,
दिपक बोंगिरवार ,ज्येष्ठ नेते
सुहास माडूरवार व्यापारी संघटना अध्यक्ष, तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अरूण वासालवार,राजकपूर भडके,निलेश बालोने,चेतन सिंह गौर शहर अध्यक्ष भाजपा,राकेश पून भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष,सोनू ताई जांभूळकर महिला शहराध्यक्ष,सुनील फुकट महामंत्री शहर,बंटी बोंगिरवार महामंत्री शहर,प्रशांत अल्लेवार युवा मोर्चा शहराध्यक्ष,प्रज्वल बोभाटे युवा मोर्चा महामंत्री शहर उपस्थित होते.यावेळी उपस्थित सर्व पत्रकाराना फेस शिल्ड तथा मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी अरूण वासलवार,राजकपूर भडके,सोनूताई जांभुळकर यांनीमोलाचे मार्गदर्शन केले.