कविता: कोरोनाची लस

कोरोनाची लस घेतांना
फिरवू नका इकडे तिकडे मान
नाहीतर नुसती सुई टोचून
तुम्हांला वाटेल छान
लस बरोबर घेतली की नाही
याची कराल कशी खात्री
अभिनय लसीकरणाचा
होईल केवळ एकपात्री
रिकामी सुई टोचूनही
तुम्हाला आनंद होईल खोटा
तुम्हीच जागृत राहून
ओळखा हा फायदा तोटा
कोरोनाची लस ही
वाढवते प्रतिकार शक्ती
पण लस घेतांना तुम्ही
ओळखा खरी खोटी युक्ती
फसगत तुमची होणार नाही
याकडे ठेवा थोडे लक्ष
जीवन आपले अमूल्य
म्हणून स्वतःच व्हा दक्ष
सुई टोचून नुसती रिकामी
तुम्हांला वाटेल लसीकरण खरे
फसवणूक होण्याआधी आजच
तुम्ही सावध झालेले बरे
कवी: गणेश रामदास निकम सर
चाळीसगाव गणेशपूर