*चाकण,पुणे* – वाढदिवसाची पार्टी आणि चॉकलेट देतो, असे आमिष दाखवून एकाने अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
ही घटना रविवारी (दि.६) भर दिवसा दुपारी अडीच ते तीन वाजताच्या कालावधीत चाकण येथे घडली.
चाकण पोलिसांनी ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ती राहत असलेल्या सोसायटीच्या गार्डनमधून घरी जात होती. त्यावेळी आरोपी तिथे आला.
त्याने तिला ‘तुला वाढदिवसाची पार्टी देतो, चॉकलेट देतो’ असे आमिष दाखवून त्याच्या कारमध्ये बसवले. त्यानंतर कारमध्ये त्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.
याबाबत भारतीय दंड विधान कलम 376, पोक्सो कायदा कलम 3, 4, 5, 8 आणि 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.