कोरोना काळात सेवा देणाऱ्या सर्व रुग्णसेवकांचा डॉक्टर दिनी सत्कार….
शिवराया विद्यार्थी संघटनेने देवदूतांचा सत्कार करून जोपासली बांधिलकी…

शिवराया विद्यार्थी संघटनेने देवदूतांचा सत्कार करून जोपासली बांधिलकी…
प्रतिनिधी/अल्लीपुर
मागील दोन वर्षांपासून थैमान घातलेल्या कोरोनाला हरविण्यासाठी सतत कार्यरत राहून सेवा देणाऱ्या अल्लीपुर येथील सर्व नामवंत डॉक्टर यांचा डॉक्टर दिनी सत्कार करून त्यांना कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या,स्वतःच्या जीवाची व परिवाराची पर्वा न-करता सर्व डॉक्टरांनी रुग्णांना उत्कृष्ट पणे सेवा दिल्याने अनेक रुग्णांचे प्राण कोरोनातुन वाचू शकले,त्यांनी रुग्णाना दिलेल्या जीवनदान बद्दल त्यांचे आभार न-व्यक्त करणारे आहे,अल्लीपुर येथील जेष्ठ डॉ.सुहास भलमे सर,डॉ.शुभम भलमे,डॉ.निलेश राडे,डॉ.गजानन करवटकर,डॉ.सूरज टिचकुले,डॉ.मयूर कातोरे या सर्वांचा शाल व श्रीफळ देऊन मंडळ अधिकारी संजय भोंग,तलाठी निशानकर,रामटेके,माजी सरपंच गजानन नरड, पत्रकार सतीश काळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शिवराया विद्यार्थी संघटनेचे संस्थापक,अध्यक्ष विद्यार्थीमित्र नितीन सेलकर, मार्गदर्शक कैलास घोडे,उपाध्यक्ष विकास गोठे,श्रुनय ढगे,निशांत लांभाडे,रोषन नरड, दिनेश गुळघाणे,मयूर डफ व सर्व पदाधिकारी उपस्थित होते…